Multibagger Stock: 10 वर्षांत 1007 टक्क्यांचा तुफानी रिटर्न… राकेश झुनझुनवालांचा फेव्हरट स्टॉक, टाटाच्या शेअरवर गुंतवणूकदार फिदा

Tata Titan Share : टाटा समूहातील या कंपनीने गुंतवणूकदारांना गेल्या 10 वर्षांत 1007 टक्क्यांचा तुफानी रिटर्न दिला आहे. टाटाच्या या शेअरवर गुंतवणूकदार फिदा झाले आहेत. तर शेअर बाजारातील तज्ज्ञ या शेअरवर बुलिश झाले आहेत.

| Updated on: Jun 23, 2026 | 4:40 PM
1 / 6
Tata Titan Share : टाटा समुहातील टायटन कंपनीने गेल्या 10 वर्षांत गुंतवणूकदारांना 1007 टक्क्यांचा तुफानी रिटर्न दिला आहे. राकेश झुनझुनवाला यांचा हा सर्वात फेव्हरेट स्टॉक होता. वडीलांनी त्यांना सुरुवातीला जे पाच हजार रुपये दिले होते. त्यातील मोठी रक्कम त्यांनी या शेअरमध्ये गुंतवले होते.

2 / 6
टाटा समुहातील बहुचर्चित कंपन्यांपैकी एक टायटनचा शेअर आज बाजार उघडताच पळाला. पण दुपारनंतर त्यात घसरण दिसून आली. सोमवारी सुद्धा या शेअरमध्ये घसरण दिसून आली होती. तर गेल्या आठवड्यात या शेअरने दमदार कामगिरी बजावली. या शेअरमध्ये सहा दिवस तेजीचे सत्र होते.

3 / 6
या शेअरवर बाजारातील तज्ज्ञ बुलिश आहेत. या शेअरचे टार्गेट प्राईस 29 टक्के अधिक आहे. बीएसईवर आज मंगळवारी टायटन लिमिटेडचा शेअर 4397.40 रुपयांवर उघडला आणि 4417.15 रुपयांच्या स्तरावर पोहचला. त्यानंतर या शेअरमध्ये दुपारी घसरण सुरू झाली.

4 / 6
ग्लोबल ब्रोकरेज हाऊस युबीएसने टायटन शेअरसाठी 5600 रुपयांचे टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. सध्याच्या या शेअरच्या किंमतीपेक्षा ही रक्कम 29 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ब्रोकरेज हाऊसने या स्टॉकला खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसच्या दाव्यानुसार, टायटनने गेल्या काही दिवसात जोरदार कामगिरी बजावली आहे.

5 / 6
टायटन शेअरचा भाव गेल्या 3 महिन्यात 11.57 टक्क्यांनी वधारला आहे. तर 6 महिन्यात या स्टॉकने  9.56 टक्क्यांचा  रिटर्न दिला आहे. गेल्या एका वर्षात शेअरची किंमत 22.53 टक्क्यांची तेजी दिसून आली. गेल्या 52 आठवड्यात शेअरने 4601.10 रुपयांची उच्चांकी झेप घेतली. आणि 52 आठवड्यात हा शेअर 3301.05 रुपयांपर्यंत घसरला.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. ही केवळ  माहिती आहे. कुठल्याही गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us