
टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा मैदानावर नेहमीच उजवी कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. पण आता त्याच्या पत्नीने मोठं मैदान जिंकलय. रिवाबा जडेजा गुजरात सरकारमध्ये मंत्री बनल्या आहेत. (PTI)

17 ऑक्टोंबर रोजी रिवाबाने गांधीनगरमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. रिवाबा जामनगरमधून आमदार आहे. वर्ष 2019 मध्ये तिने भाजपत प्रवेश केला. (PTI)

रिवाबा जडेजा मॅकेनिकल इंजिनिअर आहे. त्याशिवाय महिला सशक्तीकरणासाठी सुद्धा त्या काम करतात. म्हणूनच त्या जामनगरमधून निवडणूक जिंकल्या. आता त्यांना मंत्री बनवण्यात आलं आहे. (PTI)

रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा गुजरातच्या श्रीमंत आमदारांपैकी एक आहे. रिपोर्ट्सनुसार, तिची संपत्ती 100 कोटीच्या आसपास आहे. यात पती रवींद्र जडेजाची संपत्ती सुद्धा आहे. (PTI)

रिवाबा जडेजा अनेकदा स्टेडिअममध्ये सुद्धा दिसते. रिवाब जडेजा नवऱ्याला सपोर्ट करण्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्यावेळी सुद्धा हजर होती. आयपीएलमध्ये सुद्धा ती रवींद्र जडेजाला सपोर्ट करताना दिसते.