
वर्ल्ड कपसाठी सर्व संघांची जोरदार तयारी सुरू आहे. यंदाचा वर्ल्ड कप अनेक खेळाडूंसाठी शेवटचा असणार आहे. काही भारतीय खेळाडू आहेत ज्यांच्यासाठीही यंदाचा वर्ल्ड कप अखेरचा असणार आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो, रोहित गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळत आहे. रोहिक शर्मा आता 36 वर्षांचा असून त्याने 23 जुन 2007 ला भारतीय संघाता प्रवेश केला होता. रोहितचा यंदाचा वर्ल्ड कप शेवटचा असू शकतो.

रोहितनंतर दुसरा खेळाडू म्हणज आर अश्निन आहे. अश्निन याला अक्षर पटेल याच्या जागी संधी मिळाली आहे. अश्विन 2011 सालच्या वर्ल्ड कप संघामधील खेळाडू आहे. अश्विन आता करिअरच्या शेवटच्या टप्प्यात असून त्याचाही शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो.

तिसरा खेळाडु विराट कोहली असू शकतो. किंग कोहलीने आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आर. अश्विननंतर विराट कोहली हा दुसरा खेळाडू आहे जो 2011 च्या वर्ल्ड कप संघाचा भाग होता. कोहलीचा हा चौथा वर्ल्ड कप असून तो चौथा वर्ल्ड कप शेवटचा ठरू शकतो.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.