
प्रत्येक देशाचा संघ पाहिला तर तळापर्यंत फलंदाजीचा विचार केला तर त्यांचे गोलंदाजही सिक्सर मारण्याची क्षमता ठेवतात. मात्र भारतीय संघामध्ये असे खेळाडूू आहेत ज्यांनी वर्ल्ड कपसारख्या स्पर्धा खेळल्या आहेत. मात्र त्यांना अजुन एकही षटकार मारता आलेला नाही.

या यादीमध्ये कुलदीप यादव असून त्याने आतापर्यंत टी-20, वनडे आणि कसोटी सर्व फॉरमॅटमध्ये देशाचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. कुलदीप यादव याने 106 वन डे सामने आणि 40 टी-20 सामने खेळलेत. मात्र त्याने एकही सिक्स मारलेला नाही.

या यादीमध्ये दुसरा खेळाडू युजवेंद्र चहल आहे. 2016 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या चहलने आतापर्यंत एकही सिक्स मारलेला नाही. लिस्ट ए आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 3 सिक्स मारलेत पण आंतररष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला ही कामगिरी करता आलेली नाही.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. ईशांतने 2007 साली पदार्पण केलं असून त्याने वनडे आणि टी-20 मध्ये एकही सिक्स मारलेला नाही. कसोटीमध्ये त्याच्या नावावर एका सिक्सची नोंद आहे.

दरम्यान, संघामध्ये तळाच्या फलंदाजांकडून जास्त काही धावांची अपेक्षा नसते. मात्र इतर संघाच्या तुलनेत आपले गोलंदाज विकेट टिकवून खेळतील असा विश्वास वाटत नाही.