
हाइपरसोनिक टेक्नोलॉजी डिमॉन्सट्रेटर व्हीकल (Hypersonic Technology Demonstrator Vehicle - HSTDV) नावाचे हे क्षेपणास्त्राचा वेग तासला 6126 से 12,251 किलो मीटर आहे. त्यामुळे ते सुटल्यानंतर ते थांबवणे शक्य नाही.

क्षेपणास्त्राचा वेग तासाला 7500 किमीपर्यंत आहे. भविष्यात त्याचा वेग अधिक वाढवता येतो. त्यात अण्वस्त्र लावल्यास काही सेंकदात संपूर्ण पाकिस्तान आणि चीन उद्ध्वस्त होऊ शकते.

हाइपरसोनिक क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगापेक्षा पाच पट वेगाने जाते. त्याचा वेग इतका प्रचंड असतो की ते ट्रॅक करणेही शक्य नाही. रशिया-युक्रेन युद्धात रशियाने युक्रेनवर हाइपरसोनिक क्षेपणास्त्रांनी हल्ले केले होते.

हाइपरसोनिक क्षेपणास्त्र दोन प्रकारचे असतात. त्यात पहिला प्रकार ग्लाइड व्हिकल्स तर दुसरा क्रूज क्षेपणास्त्र आहे. त्यातील ग्लाइड व्हिकल्सच्या मागे क्षेपणास्त्र लावले जाते. हे व्हिकल्स स्वत:च दिशा तयार करतो.

हाइपरसोनिक क्षेपणास्त्र अमेरिका, रशिया अन् चीनकडे आहे. तसेच उत्तर कोरियासंदर्भात बातम्या येतात. परंतु त्याचे कोणतेही पुरावे नाहीत. तसेच ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपमधील देशही त्यासाठी प्रयत्न करत आहेत.