थलपती शेअर! Thalapathy विजय यांच्याकडे कोण कोणते स्टॉक?

Thalapathy Vijay Share Investments: तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्याकडे कोण कोणते स्टॉक आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी पैसा कुठं कुठं गुंतवला आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

| Updated on: May 10, 2026 | 5:04 PM
1 / 6
Thalapathy Vijay Share Investments: तामिळनाडूच्या राजकारणात नवीन पक्षाची घोडदौड सुरू झाली आहे. जोसेफ विजय यांनी नवीन मुख्यमंत्री म्हणून कमान संभाळली आहे. त्यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे.

2 / 6
थलपती विजय यांची एकूण संपत्ती 624 कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्याकडे आणि पत्नीकडे काही किलो सोने आहेत. काही किलो चांदी आहे. अर्थात त्यांच्या पत्नीकडे सोने आणि चांदी हे त्यांच्यापेक्षा अधिक आहे. तर त्याचवेळी त्यांनी काही गुंतवणूक शेअर बाजारातही केल्याचे समोर आले आहे.

3 / 6
त्यांच्या पोर्टफोलियोत सुचीबद्ध आणि असुचीबद्ध शेअर आहेत. त्यांचे एकूण मूल्य केवळ 19.37 लाख आहे. अर्थात त्यांच्या एकूण संपत्तीत शेअर बाजारातील गुंतवणुकीचा टक्का अवघा 0.04 टक्क्यांहून कमी आहे. तरीही विजय यांनी कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक केली याची सारखी चर्चा होत आहे.

4 / 6
तर विजय थलपती यांनी जयनगर प्रॉपर्टीजचे 19.03 लाख शेअर खरेदी केले आहेत. याशिवाय थलपतींकडे सन पेपर मिल्सचे शेअर आहेत.यामध्ये त्यांनी 25 हजारांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय इंडियन ओव्हरसीज बँकेतही त्यांनी गुंतवणूक केली आहे. या सरकारी बँकेत त्यांचे 9,600 शेअर आहेत.

5 / 6
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडे केवळ शेअरच आहेत असे नाही तर त्यांनी म्युच्युअल फंड, बाँड, डिबेंचरमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांच्या एकूण गुंतवणुकीकडे पाहता विजय जोखीम असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करत नसल्याचे दिसून येते.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us