Vijay Tamilnadu CM : नुसत्या FD मधून तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री दर महिन्याला कमावतात इतके लाख, आता पगार किती मिळणार?

TVK Vijay Tamilnadu CM : तामिळनाडूमध्ये अखेर काल थलपती विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. बहुमतासाठी विजय यांना 11 जागा कमी पडत होत्या. मागच्या चार दिवसांपासून फसलेला पेच शनिवारी सुटला. छोट्या पक्षांच्या मदतीने थलपती विजय यांनी सरकार स्थापन केलं. त्यांच्या TVK पक्षाने पर्दापणातच 107 जागा जिंकल्या आहेत.

| Updated on: May 11, 2026 | 1:41 PM
1 / 5
तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून थलपती विजय यांना महिन्याला 2.85 लाख रुपये वेतन मिळेल. त्याशिवाय भत्ते, आमदार म्हणून वेतन, भत्ते आणि अन्य सुविधा मिळतील. ही झाली त्यांची राजकीय कमाई. फिल्म स्टार म्हणून ते कोट्यवधी रुपये कमावतात.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून थलपती विजय यांना महिन्याला 2.85 लाख रुपये वेतन मिळेल. त्याशिवाय भत्ते, आमदार म्हणून वेतन, भत्ते आणि अन्य सुविधा मिळतील. ही झाली त्यांची राजकीय कमाई. फिल्म स्टार म्हणून ते कोट्यवधी रुपये कमावतात.

2 / 5

तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्र्यांची नेटवर्थ 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कमाई जास्त असल्याने ते सर्वाधिक टॅक्स देणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या चल आणि अचल संपत्तीचं वॅल्युएशन 648 कोटी रुपये होतं. त्यांच्यावर 7 कोटींचं कर्ज आहे.

3 / 5

थलपती विजय यांनी बँकेत भरपूर पैसा जमा करुन ठेवला आहे. त्यांच्या एफिडेविटनुसार, त्यांच्या बँक खात्यात 230 कोटीपेक्षा जास्त रक्कम आहे. कॅश बद्दल बोलायचं झाल्यास निवडणुकीच्या आधी त्यांच्या हातात 2 लाख रुपये कॅश होती.

4 / 5

विजय यांनी वेगवेगळ्या बँकेत 100 कोटी रुपये FD मध्ये जमा करुन ठेवले आहेत. त्यांच्या नावावर 4 फिक्सड डिपॉजिट आहेत. त्यातून दर महिन्याला 54 लाख रुपये ते व्याजापोटी कमावतात. थलपती विजयचा साऊथच्या श्रीमंत अभिनेत्यांमध्ये समावेश होतो.

5 / 5

शेअर मार्केटमध्ये विजय यांची गुंतवणूक 20 लाखापेक्षा पण कमी आहे. गुंतवणूक पोर्टफोलियो बद्दल बोलायचं झाल्यास जास्त शेअर्स जया नागा प्रॉपर्टीचे आहेत. त्यात 19 लाख रुपयाची गुंतवणूक आहे. त्याशिवाय इंडियन ओवरीज, सन पेपर मिलचे सुद्धा शेअर विकत घेतले आहेत. विजय यांच्या नावावर कुठलीही LIC पॉलिसी नाहीय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us