
आज आपण महाराष्ट्राच्या ठाणे शहराजवळील डोंबिवलीपासून अवघ्या ७३ किमीवर असलेल्या एका हिल स्टेशनच्या बद्दल माहीती घेणार आहोत.

हे हिल स्टेशन महाराष्ट्राच्या ठाण्याजवळील डोबिंवली शहरापासून अवघ्या ७३ किमीवर आहे, या हिल स्टेशनचं नाव खंडाळा आहे.

मध्य रेल्वे लोहमार्गाने हे खंडाळा-लोणावळा हे शहर जोडलेले आहे. तुम्ही पुण्यासाठी जाणाऱ्या एक्सप्रेसने लोणावळा जाऊ शकता. येथून खंडाला जवळच आहे. येथे निसर्गाचा अद्भूत नजारा पाहायला मिळू शकतो.

ही जागा सुंदर हिरवे डोंगर आणि दऱ्या आणि धबधब्यांनी नटलेली आहे. ज्याचे नैसर्गिक सौदर्य तुमचा सर्व ताण आणि थकवा दूर करेल.

जर उन्हाळ्यात तुम्हाला एक दिवसाची पिकनिक काढायची असेल तर खंडाळा हिल स्टेशनचे नाव तुमच्या यादीत समाविष्ट कराच.येथे उन्हाळ्यातही आल्हाददायक वातावरण अनभवू शकतो.