Supermoon 2025: आज संध्याकाळी दिसणार वर्षातील शेवटचा सुपरमून, ‘या’ ३ राशींचे चमकेल भाग्य!

Supermoon 2025: आज4 डिसेंबर 2025, गुरुवार म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा. या दिवशी वर्षातील तिसरा आणि शेवटचा सुपरमून दिसणार आहे. चंद्रदेव दिवसभर वृषभ राशीत उच्चस्थानी राहतील, त्यामुळे सर्व 12 राशींवर त्याचा मिश्र परिणाम जाणवेल. पण विशेषतः ‘या’ तीन राशींसाठी आजचा दिवस खूप शुभ आणि भाग्योदयाचा ठरणार आहे. यामध्ये तुमची रास आहे का पाहा...

Updated on: Dec 04, 2025 | 4:49 PM
1 / 6
सुपरमून ही एक अप्रतिम खगोलीय घटना आहे आणि धार्मिक-ज्योतिषीय दृष्टीनेही फार महत्त्वाची मानली जाते. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ येतो तेव्हा त्या पौर्णिमेला सुपरमून किंवा इंग्रजीत ‘कोल्ड मून’ म्हणतात. या दिवशी चंद्र नेहमीपेक्षा 14 टक्के मोठा आणि 30 टक्के जास्त तेजस्वी दिसतो. द्रिक पंचांगानुसार आजची मार्गशीर्ष पौर्णिमा ही वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे आणि याच दिवशी शेवटचा सुपरमूनही दिसेल.

2 / 6
 वृषभ रास: चंद्रदेव आज तुमच्याच राशीत उच्चस्थानी आहेत, त्यामुळे तुम्हाला सर्वांत जास्त लाभ होईल. मन शांत आणि भावना स्थिर राहतील. जुने गैरसमज, मतभेद दूर करण्याची उत्तम संधी आहे. नातेसंबंध किंवा व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. उपाय : तांब्याच्या लोट्यात दूध, गंगाजल आणि खडीसाखर मिसळून चंद्रदेवांना अर्घ्य द्या.

3 / 6
कर्क रास: नवीन सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या गोष्टी मागे सोडून पुढे जाल तर खूप चांगले होईल. एखाद्या जुना संपर्कातून अपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत दिवस स्थिर राहील, कर्ज घ्यावे लागणार नाही. उपाय : संध्याकाळी चंद्रदेवांना तांदळाची खीर किंवा दूध-भाताचा नैवेद्य दाखवा.

4 / 6
वृश्चिक रास: मन स्थिर राहील, नातेसंबंध दृढ करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. जुने गैरसमज दूर होतील. व्यवसायातील मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आरोग्य चांगले राहील आणि जुनी वाईट सवयी सोडून चांगली दिनचर्या अवलंबिण्याची प्रेरणा मिळेल. उपाय : चांदीच्या लोट्यात गंगाजल भरून चंद्रदेवांना अर्घ्य द्या.

5 / 6
आज संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी म्हणजे सूर्यास्तानंतर लगेच सुपरमून दिसायला सुरुवात होईल आणि उद्या सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत तो दिसत राहील. पूर्ण रात्रभर तुम्ही हा सुंदर सुपरमून न्याहाळू शकता.

6 / 6
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)