भोंदू बाबा मनोहर भोसले याचा २७ एकरावरील आलिशान आश्रम चर्चेत, दर अमावस्येला भरायचा दरबार

सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील घोटी येथे भोंदू मनोहर भोसले मामाचा २७ एकरावरील पसरलेला आलिशान आश्रम सध्या चर्चेत आला आहे. दर अमावस्येला शेकडो बडी आणि राजकीय मंडळी या बाबाच्या दरबारात यायची...

| Updated on: Apr 25, 2026 | 5:51 PM
1 / 7
 नाशिकचे भोंदू बाबा अशोक खरात याचे प्रकरण ताजे असताना बुवाबाजी प्रकरणात आणखी एक भोंदू बाबा मनोहर भोसले याला अटक झाली आहे. या भोंदू बाबा मनोहर भोसले याचा करमाळा तालुक्यातील घोटी या ठिकाणी आलिशान आश्रम आहे.

2 / 7
 दर अमावस्येला या  ठिकाणी त्याच्या दर्शनाला बडीमंडळी आणि राजकीय नेत्यांची गर्दी व्हायची. कोणाला घरातील काही समस्या असायच्या तर कोणाला आर्थिक समस्या, कोणाला आपले भविष्य जाणून घ्यायचे असायचे अशी सर्व बडीमंडळी या मामाच्या चरणी दाखल झालेली असायची.

3 / 7
दर अमावस्येला शंभर ते दीडशे आलिशान गाड्या या माळरानावरील आलिशान आश्रमात येत असत. यामध्ये सर्वच पक्षाचे राजकीय नेते आमदार, खासदार, बडे उद्योजक, शिक्षण सम्राट अशा अनेकांना मनोहरमामाने वेड लावले होते.

4 / 7
या आश्रमाच्या सभा मंडपासाठी थेट राजस्थान आणि कोकणातून लाल दगड आणल्याचे सांगितले जात आहे.या जागेत भक्तांच्या प्रतीक्षेसाठी मोठा हॉल असून आत मामांची आलिशान केबिन आहे. संपूर्ण आश्रमाला कंपाउंड करण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.

5 / 7
सध्या मनोहर मामाच्या या आश्रमात कालपासून पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. सध्या पोलीस बाहेरच्या कोणालाही आश्रमात सोडत नसून आश्रमातूनही कोणाला बाहेर जाऊ दिले जात नाही.

6 / 7
त्यामुळे सध्या या आश्रमात भोंदू मनोहर मामांचा सेवकवर्ग असून बाहेरचा कोणीही सध्या आश्रमात जाऊ शकत नाही. सोलापूर पोलिसांनी भोंदू बाबाच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली असून सध्या मनोहर भोसले हा पोलिसांच्या रडारवर आहेत .

7 / 7
२७ एकरावर पसरलेल्या या आलिशान आश्रमात गेल्या पाच वर्षापासून नवनवीन विकास कामे सुरू असून आश्रमाच्या समोरच आंब्याची मोठी बाग आहे.

Follow Us