Post Office ची धमाल योजना, पैसा करते डबल, 5 लाख गुंतवा आणि मिळावा रु.10,000,00
पोस्टाच्या सरकारी योजना गुंतवणूकीसाठी अगदी सुरक्षित असतात. यातील पैशांना सरकारचे संरक्षण असते. त्यामुळे डोळे झाकून निर्धास्तपणे गुंतवणूक करता येते. पोस्टाची एक योजना तुमचे पैसे डबल करुन देते. या योजनेत तुम्ही जितका जास्त पैसा गुंतवाल तेवढा जास्त फायदा होता.

सुरक्षित गुंतवणूक (Investment) आणि चांगले रिटर्न (Return) हवे असतील तर पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हींग स्कीम्सना पहिली पसंद दिली जाते. Post Office Schemes मधील गुंतवणूकीची सुरक्षा गॅरंटी सरकार स्वत: देते आणि यात गुंतवणूकीनंतर व्याजही खात्रीलायक मिळते. अशीच एक सरकारी योजना (Govt Scheme) आहे. तिचे नाव पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजना (Post Office Kisan Vikas Patra Scheme). यात ठराविक पैसे गुंतवल्यास ते दुप्पट होतात. (Photo: ITG)

115 महीन्यात पैसे डबल - पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patra Scheme) आपल्या गुंतवणूकदारांना केवळ 115 महिन्यात पैसे डबल करण्याची गॅरंटी देते.या पैसे डबल करणाऱ्या योजनेत सरकार चांगले 7.50 टक्के व्याज देते. यात गुंतवणूकीवर एकूण रकमेवर वार्षिक व्याज मिळते. या योजनेची मॅच्युरिटी पीरियड 115 महिने म्हणजे 9 वर्षे 7 महिन्यांचा आहे. याच्या व्याजामुळे मॅच्युरिटीपर्यंत पैसे डबल होतात.(Photo: ITG)

केवळ 1000 रुपयात खाते उघडू शकता - Post Office KVP Scheme या योजनेची खास गोष्ट म्हणजे पैसे दुप्पट होणे आणि झिरो रिस्क गॅरंटी होय. या सरकारी योजनेसाठी गुंतवणूकीची सुरुवात किमान 1000 रुपयाने खाते उघडून करता यते. कमाल रक्कम तुम्ही कितीही गुंतवू शकता. यात कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. (Photo: ITG)

सिंगल-डबल कितीही खाती उघडू शकता - KVP Scheme अंतर्गत तुम्ही सिंगल किंवा डबला दोन्ही प्रकारचे खाते उघडू शकता.या सरकारी स्कीमची आणखी एक खास बाब म्हणजे गुंतवणूकदार कितीही KVP Account ओपन करु शकतो. यात कोणतीही मर्यादा निश्चित नाही.दोन अकाऊंट देखील उघडता येतात. त्याहून अधिकही उघडता येतात.10 वर्षाहून जास्त वयाच्या मुलाच्या नावाने देखील किसान विकास पत्र स्कीमचे खाते उघडता येते.(Photo: ITG)

कसे होतात पैसे डबल ? - या सरकारी योजनेच्या गुंतवणूक रकमेवर व्याजाची मोजणी चक्रवाढ व्याजाने केली जाते. 1 लाख रुपये जर यात गुंतवले तर पहिल्या वर्षात मिळणारे व्याज 7,500 रुपये असेल. ही रक्कम पुढच्या वर्षीसाठी प्रिंसिपल अमाऊंटशी जोडली जाईल. आणि रक्कम वाढून 1,07,500 रुपये होईल. आता या रकमेवर दुसऱ्या वर्षी 8,062 रुपये व्याज होईल.हीच रक्कम तिसऱ्या वर्षासाठी मूळ रकमेत जोडून 1,15,562 रुपये होईल. अशाच प्रकारे पुढच्या वर्षात ही रक्कम वाढत जाईल. अशाच प्रकारे पाच लाख दिल्यानंतर पहिल्या वर्षी 5.37 लाख, दूसऱ्या वर्षी 5.77 लाख, पाचव्या वर्षी 7.17 लाख, 8 व्या वर्षी 8.91 लाख आणि 9 वर्षे 7 महिन्यात 10 लाख रुपये होतील. तुम्ही जेवढी जास्त रक्कम गुंतवाल तेवढा जास्त फायदा होईल.(Photo: ITG)

- सहज खोलू शकता खाते ? - तुम्ही पोस्ट ऑफिसात जाऊन किसान विकास पत्र स्कीमसाठी सहज खाते उघडू शकता. तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफीसात जाऊन किंवा पब्लिक सेक्टर बँकेत जाऊनही ऑफलाईन अकाऊंट ओपन करु शकता.ही बाब ध्यानात घ्या की तुमच्या गुंतवणूकीच्या तारखेनंतर 2.5 वर्षे (30 महीने) पूर्ण होण्याआधी सर्वसाधारणपणे पैसे काढू शकत नाही. (Photo: ITG)