
काही दिवसांपूर्वीच आपल्या प्रेमासाठी पाकिस्तानमधून नेपाळ मार्गे भारतामध्ये सीमा हैदर ही दाखल झालीये. याच सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या लव्ह स्टोरीवर चित्रपट तयार केला जातोय.

सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्यावर तयार केला जात असलेल्या चित्रपटाचे नाव कराची टू नोएडा असे आहे. आता याच चित्रपटाबद्दल मोठे अपडेट पुढे आले.

या चित्रपटाची शूटिंग दिल्लीतील नरेला कुंडली, पानीपत आणि दिल्ली नोएडा येथे केली जाणार आहे. 10 ते 11 आॅक्टोबरपर्यंत ही शूटिंग केली जाणार आहे.

यादरम्यान येथे तब्बल 30 सीन्स शूट केले जाणार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. सोमवारी चित्रपटाची टीम मुंबईवरून दिल्लीत दाखल होईल.

गदर 2 चित्रपटातील अभिनेता रोहित चाैधरी हा कराची टू नोएडा या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले जातंय.