अखेर चिंताच मिटली, पेट्रोल-डिझेलबाबत सरकारकडून मोठी माहिती; टंचाई होणारच नाही!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोन्याची खरेदी करू नका, डेस्टिनेशन वेडिंग टाळा असे म्हणत देशातील पैसा देशातच राहिला पाहिजे असे सांगितले आहे. त्यामुळे मोंदीचे हे आवाहन म्हणजे भविष्यातील संकटाची चाहुल तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.

पश्चिम आशियातील स्थिती सध्या चिंताजनक आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. परिणाम होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेलवाहतूक अजूनही ठप्पच आहे. त्याचा परिणाम भारतावर होत आहे.

हे युद्ध सुरू झाले तेव्हापासून गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. अशीच स्थिती राहिली तर भविष्यात पेट्रोल आणि डिझेलचा भावही वाढवण्याशिवाय गत्यंतर नाही, असे जाणकारांकडून सांगितले जात आहे. ही शक्यता जर खरी ठरली तर पुन्हा एकदा सामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोन्याची खरेदी करू नका, डेस्टिनेशन वेडिंग टाळा असे म्हणत देशातील पैसा देशातच राहिला पाहिजे असे सांगितले आहे. त्यामुळे मोंदीचे हे आवाहन म्हणजे भविष्यातील संकटाची चाहुल तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.

या सर्व अनिश्चिततेत भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या साठ्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता वर्मा यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळण्यासाठी भारताकडे पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशाकडे कच्चे तेल, पेट्रोल, एलपीजी यांचा पुरेसा साठा आहे. देशात इंधनाची कोणतीही कमतरता भासणार नाही. सामान्य जनतेला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पुरवठ्याकडे सरकारचे पुरेसे लक्ष आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.