
१ - हृदयविकारांचे वाढत्या प्रमाणामुळे जागरुकता आणि बचावांची गरज निर्माण झाली आहे. शहरीकरण, बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, बैठी जीवनशैली आणि लठ्ठपणा तसेच मधुमेह यामुळे हृदय विकाराचे प्रमाण वाढले आहे.

२ -रक्तदाबातील वाढ - रक्तदाब वाढलेला असल्याने माणसाच्या आर्टरिज ( धमन्या ) डॅमेज होतात. त्यामुळे प्लाक तयार होण्याचा आणि हृदयविकाराचा धोका वाढत असतो.

३ - कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे - LDL कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने धमन्यातील चरबी वाढते. त्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठ्यास अडथळा निर्माण होत असतो.

४ - रक्तातील साखर वाढणे ( डायबिटीस किंवा प्री डायबिटीस ) - ग्लुकोजच्या उच्च पातळीने रक्तवाहिन्या डॅमेज होतात आणि हृदय विकाराला आमंत्रण मिळत असते.

५ - धुम्रपानाचा इतिहास - तंबाकूमुळे हृदय आणि रक्तवाहिन्या नुकसान होते, त्यामुळे आपोआपच हृदयविकाराला आंमत्रण मिळत असते.

६ - हृदयविकाराचा मोठा आजार होईपर्यंत या ४ धोक्यांची लक्षणे शरीरात दिसून येत नाहीत. घटकांमुळे लक्षणे दिसून येत नाहीत, म्हणूनच आरोग्याची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.