
लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिर्ची विटामिन सीचा चांगला स्रोत आहे. यातील आयर्न शरीरातील कमजोर आणि थकवा कमी करते. हिवाळ्याच्या मोसमात तुम्ही सलाड वा सूपाच्या रुपात ही भाजी खाऊ शकतो.

पालक हा आयर्न ( लोह ) सगळ्यात चांगला स्रोत आहे. पालकच्या भाजीत आयर्नशिवाय व्हिटामिन्स सी देखील मोठ्या प्रमाणात असते, जे शरीरात आयर्न शोषण करण्यास मदत करते. पालक खाण्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.

मेथीच्या भाजीतही लोह म्हणजे आयर्न भरपूर असते. याशिवाय या भाजीत फोलेट आणि कॅल्शियम देखील आढळते. व्हिटामिन्स सी असल्याने मेथीची भाजी त्वचेसह इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी देखील मदत करते. हिवाळ्यात मेथीचे पराठे वा भाजीच्या रुपात मेथी खाणे गरजेचे असते.

शरीरातील रक्ताची कमी दूर करण्यासाठी बिटची भाजी चांगली असते. यात आयर्नसह व्हिटामिन्स सी देखील असते. तसेच फोलेटचा देखील बिट चांगला स्रोत आहे. बिट हे थंड असल्याने हिवाळ्यात कमी प्रमाणात खावे.

ब्रोकोलीच्या भाजीत लोह आणि व्हिटामिन्स सी तसेच फायबर हे तिन्ही घटक असतात. ही भाजी रक्ताची कमतरता दूर करण्यासोबत शरीराला डिटॉक्स करण्यातही मदत करते. यास भाजीला थोडे उकडून वा स्टीम्ड सलाडमध्ये सामील करु शकता.