भारताच्या या ७ राज्यांची पेयं आहेत प्रचंड प्रसिद्ध, टेस्ट अशी भन्नाट की पुन्हा, पुन्हा प्याल

भारत देश त्याच्या विविधतेसाठी ओळखला जातो. येथे प्रत्येक प्रांतातील खाद्यपदार्थ आणि पेय यांचे खास वैशिष्ट्ये आहेत. येथील प्रत्येक राज्याचे एक सिग्नेचर ड्रिंक प्रसिद्ध आहे. जे येथील संस्कृती दर्शवते. अशी 7 पेय आज आपण पाहणार आहोत. ज्यांना तुम्ही एकदा प्यायले तर त्याची चव कधीच विसरणार नाही...

| Updated on: Feb 28, 2026 | 8:42 PM
1 / 7
 लस्सी (पंजाब, हरियाणा): लस्सी दह्यापासून तयार होते. यात काही मसाले आणि फळे वा गुलाब जल टाकले जाते. हे एक रिफ्रेशिंग आणि कुलिंग ड्रिंक आहे. उत्तर भारत आणि पंजाबात लस्सी सर्व्ह केली जाते, जी रिफ्रेशमेंट आणि न्यूट्रिशन दोन्ही असते.

2 / 7
कैरी पन्हे  (उत्तर भारत आणि महाराष्ट्र ): कच्च्या कैरींपासून तयार होणारे कैरी पन्हे उन्हाळ्यातील एक खास रिफ्रेशिंग ड्रींक आहे.  यास उत्तर भारतात आम पन्ना म्हणतात. हे पेय गोड, आंबट असते. त्यात जिरे आणि काळे मीठ घातलेले असते. राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब विशेषत: महाराष्ट्रात हे कैरी पन्हे म्हणून प्रसिद्ध आहे.

3 / 7
 महुआ (मध्य प्रदेश, छत्तीसगड ): महुआ एक पारंपरिक आदिवासी मद्य आहे, जे महुआच्या झाडांच्या फुलांपासून तयार होते. हलकी गोड आणि सणासुदीला आदिवासी आनंद साजरा करण्यासाठी हे मद्य पितात. हीचा माती सारखा सुंगध त्या जंगलातील खास भागाची खासियत आहे जेथे हीची निर्मिती केली जाते.

4 / 7
सोल कडी (महाराष्ट्र, गोवा): कोकम फळ आणि  नारळाच्या दूधापासून तयार होणारे हे सॉफ्ट ड्रिंक चवीला खूपच स्वादिष्ठ असते आणि जेवण पचायला मदत करते. खासकरुन कोकणात मालवणी पद्धतीचे जेवण केल्यानंतर सोलकडीचा स्वाद घेणे हा आनंदाचा परमोच्च क्षण असतो.

5 / 7
 ताडी (केरळ, तामिळनाडु, कर्नाटक, महाराष्ट्र ): ताडी ही ताडाच्या झाडांवरुन काढली जाते. ही ताडाच्या बुंध्यातून रस काढून तयार केली जाते. गोड तसेच हल्की अल्कोहोलिक असते. दक्षिण भारतातील गावात ती अधिक प्रसिद्ध आहे.ताडीच्या दुकानात तिला थंड किंवा फर्मेंटेड करुन लोकल डिश सोबत  सर्व्ह केले जाते. ही एक चांगला आनंदी अनुभव देते.

6 / 7
 फेनी (गोवा): फेनी ही काजू वा नारळापासून तयार होणारे स्ट्राँग डिस्टिल्ड मद्य आहे. फेणी ही फळांचा स्वाद आणि तीव्र झणकेदार चवीमुळे गोव्याच्या संस्कृतीचा एक महत्वाचा भाग बनली आहे.सणासुदीला किंवा सेलिब्रेशनमध्ये हे ड्रिंक दिले जाते. लोकल सी-फूडसोबत तिला सर्व्ह केले जाते.

7 / 7
ठंडाई (उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र): ठंडाई एक मसालेदार दूधाचे ड्रिंक असून पारंपारिक रुपाने सणासुदीसाठी सादर केले जाते. बदाम, बडीसौफ, इलायची आणि गुलाबाच्या पाकळ्या तयार होणार ठंडाई हे पेय रिफ्रेशिंग आणि आरोग्यदायी देखील असते. काही भागात यात भांग देखील मिस्क केली जाते.

Follow Us