हार्मोन्सचे असंतुलन टाळण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन ठरते फायदेशीर

| Updated on: Feb 28, 2023 | 2:39 PM

हार्मोनल असंतुलन टाळण्यासाठी, लोकांना निरोगी जीवनशैली आणि निरोगी आहाराचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो.

1 / 5
 हार्मोन्समुळे शरीराची विविध कार्य योग्य पद्धतीने होण्यास मदत मिळते. जेव्हा शरीरातील हार्मोन्सची पातळी कमी होते किंवा खूप वाढते तेव्हा त्याचा या कार्यांवरही परिणाम होतो. हार्मोन्सची पातळी खालावल्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या आणि गंभीर आजार होऊ शकतात. म्हणून, लोकांना हार्मोन्सच्या पातळीत जास्त बदल टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली आणि निरोगी आहाराचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो.

2 / 5
ब्रोकोली : हार्मोनल बॅलन्समध्ये ब्रोकोलीचे सेवन केल्यास आराम मिळतो. ज्या लोकांच्या शरीरात इस्ट्रोजेन हार्मोन्सची पातळी खूप कमी झाली आहे त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. याचे भाजी किंवा सॅलॅडच्या स्वरुपात सेवन करता येते.

3 / 5
 टोमॅटो : व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीनने युक्त असे टोमॅटो खाल्ल्याने हार्मोनल असंतुलन दूर होते. टोमॅटोमध्ये आढळणारे काही घटक शरीराला अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण देतात आणि शरीर निरोगी ठेवतात.

4 / 5
कोबी :  कोबी ही एक चविष्ट आणि पौष्टिक भाजी आहे जी हार्मोन्सची पातळी देखील सुधारते. कोबीमध्ये असे घटक आणि संयुगे असतात जे हार्मोन्सची पातळी राखण्याचे काम करतात. तुम्ही त्याचे भाजी, पराठे यांच्या स्वरुपात सेवन करू शकता.

5 / 5
बीट : बीटाची भाजी किंवा त्याचा रस प्यायल्याने शरीराला पोषण मिळते. हार्मोनल असंतुलन असल्यास बीटाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. बीटामध्ये असे घटक आढळतात जे हार्मोन्स नियंत्रित करतात. त्याचप्रमाणे ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतात.