High Blood Pressure : रोजच्या या चुकांमुळे हळूहळू वाढतंय तुमचं बीपी, वेळीच द्या लक्ष

चांगल्या सवयींमुळे निरोगी आयुष्य घडतं. अनियमित सवयी, खाण-पिणं, चुकीच्या सवयी यामुळे प्रकृती बिघडू शकते. रोजच्या आयुष्यातल्या चुकींमुळे हाय बीपीचं दुखणं मागे लागू शकतं. कोणत्या आहेत त्या सवयी ?

| Updated on: Jan 11, 2026 | 11:52 AM
1 / 6
आजकाल, उच्च रक्तदाबाचे (High Blood Pressure) रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, विशेषतः तरुणांमध्ये हाय बीपीचा त्रास खूप वाढताना दिसत आहे. उच्च रक्तदाब हा काही अचानक उद्भवत नाही, पण रोजच्या आयुष्य़ातीस आपल्या काही सवयींमुळे हळूहळू हा त्रास होऊन परिणाम दिसू लागतो.  खरं तर, झोप, ताणतणाव, आहार आणि जीवनशैलीशी संबंधित छोट्या चुका झाल्यानेत कालांतराने रक्तदाब वाढू शकतो. रोजच्या आयुष्यातील अशा चुका कोणत्या ज्यामुळे वाढतो रक्तदाब ते एक्स्पर्टनी सांगितलं आहे.  चला जाणून घेऊ...

2 / 6
एक्सपर्ट्सच्या सांगण्यानुसार, संपूर्ण  दिवसात 7 तासांपेक्षा कमी झोप झाली तर रक्तदाब वाढू शकतो. विशेषतः जर तुम्ही 5 ते 6 तासांपेक्षा कमी झोपलात तर उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. झोपेच्या कमतरतेमुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, रात्री रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी होत नाही आणि कोर्टिसोलची पातळी वाढते.

3 / 6
याशिवाय, सततच्या मानसिक ताणामुळे शरीरात कॉर्टिसोल हार्मोनचे प्रमाण जास्त काळ टिकून राहते. तज्ञ तर असंही सांगतात की सतत ताणतणाव जाणवत असेल तर सिंपथेटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिव्ह राहते, ज्यामुळे दिवसभर सरासरी रक्तदाब वाढतो. यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका आणखीनच वाढतो.

4 / 6
रात्री उशिरा जेवल्याने शरीराच्या सर्कॅडियन रिदममध्ये व्यत्यय येतो, ज्यामुळे मूत्रपिंडातील सोडियम बॅनेल्स, इन्सुलिन सेन्सिव्हिटी आणि झोपेची गुणवत्ता प्रभावित होते. रिसर्चनुसार, संध्याकाळी किंवा रात्री जास्त कॅलरीज घेतल्याने रात्रीचा रक्तदाब वाढू शकतो आणि दीर्घकाळात उच्च रक्तदाबाचा धोका वाढत जातो.

5 / 6
तज्ञांच्या सांगण्यानुसार, व्हिसेरल फॅट किंवा पोटातील चरबीचा रक्तदाबाशी संबंध आहे. वाढत्या कंबरेमुळे हार्मोनल बदल, जळजळ आणि मूत्रपिंडात सोडियम साठू शकतं. म्हणूनच बऱ्याच प्रकरणांमध्ये वजनापेक्षा कंबरेचा आकार हे रक्तदाबाचे चांगले सूचक मानले जाते.

6 / 6
तसेच कॉफी किंवा इतर कॅफिनयुक्त पेयं ही देखील रक्तदाब तात्काळ वाढवू शकतात. परंतु जास्त किंवा उशिरा कॅफिनचे सेवन केल्याने झोपेमध्ये व्यत्यय येतो, ज्यामुळे ताण वाढतो आणि रक्तदाब नियंत्रणात रहात नाही.  कॅफिनवर सतत अवलंबून राहिल्याने उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो.