
जर तुम्ही नवीन कार विकत घेण्याची तयारी करत असाल तर पैसे तयार ठेवा. कारण पुढच्या महिन्यात अनेक कार रस्त्यावर राज करणार आहेत. डिसेंबरात मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि किआ च्या नवीन एसयुव्ही बाजारात येऊ शकतात.(फोटो- मारुती सुझुकी)

Maruti Suzuki e Vitara: मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रीक कार डिसेंबरमध्ये लाँच होऊ शकते. या एसयुव्हीला 49kWh आणि 61kWh असे दोन बॅटरीच्या पर्यायात उतरवले जाणार आहे. 17 ते 22.5 लाख रुपयांच्या किंमतीत या एसयुव्हीला उतरवले जाऊ शकते. ही कार सिंगल चार्जमध्ये 500 किलोमीटरपर्यंत रेंज देऊ शकते. (फोटो- मारुती सुझुकी)

Tata Safari (पेट्रोल व्हेरिएंट): एसयूव्ही सेगमेंटमध्ये टाटा सफारी हे मोठे नाव आहे. कंपनी येत्या 9 डिसेंबर रोजी या एसयुव्हीच्या पेट्रोल व्हेरिएंटला लाँच करु शकते. ( फोटो - टाटा मोटर्स )

Tata Harrier (पेट्रोल व्हेरिएंट): टाटा सफारीच्या बरोबरीला हॅरियरचे पेट्रोल व्हर्जन देखील 9 डिसेंबरला लाँच केले जाणार आहे. सध्या या कारला कोणत्या इंजिनात उतरवले जाणार आहे याची काहीही माहिती उघड झालेली नाही. ( फोटो- टाटा मोटर्स)

Kia Seltos (2nd Generation): नेक्स्ट जेनरेशन किआ सेल्टोसला 10 डिसेंबरला ग्लोबल डेब्यू आणि 2026 च्या सुरुवातीला हीला भारतीय बाजारात लाँच केले जाणार आहे. (फोटो- किआ)