
फिल्म इंडस्ट्रीत एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्रींना अभिनेत्यांपेक्षा कमी मानधन मिळायचं. मात्र आता अनेक अभिनेत्री या अभिनेत्यांइतकंच आणि कधी कधी त्यांच्यापेक्षाही जास्त मानधन स्वीकारत आहेत. यामध्ये अशा एका अभिनेत्रीचाही समावेश आहे, जिने अवघ्या 50 सेकंदांच्या जाहिरातीसाठी 5 कोटी रुपये फी घेतली आहे.

ही अभिनेत्री दीपिका पादुकोण किंवा करीना कपूर नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा आहे. नयनताराने शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर 'जवान' चित्रपटातही काम केलंय. तिने टाटा स्कायच्या एका जाहिरातीसाठी 5 कोटी रुपये मानधन स्वीकारलं होतं. ही जाहिरात फक्त 50 सेकंदांची होती.

टाटा स्कायची ही जाहिराती दोन दिवसांत चार विविध भाषांमध्ये शूट करण्यात आली होती. तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा चार दाक्षिणात्य भाषांमध्ये ही जाहिरात प्रसारित झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नयनतारा एका चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मानधन घेते.

नयनताराचा केवळ दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण देशात मोठा चाहतावर्ग आहे. टेलिव्हिजन होस्ट म्हणून तिने करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. नयनतारा आता अत्यंत आलिशान आयुष्य जगते.

पती विग्नेश शिवनसोबत ती 4 बीएचके अपार्टमेंटमध्ये राहते. काही रिपोर्ट्सनुसार त्यांच्या या घराची किंमत तब्बल 100 कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय नयनतारा ही एका प्रायव्हेट जेटचीही मालकीण आहे.