
या वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण 29 मार्च रोजी होतं. हे ग्रहण मात्र भारतात दिसलं नाही. आता या वर्षातलं दुसरं ग्रहण 21 सप्टेंबर रोजी दिसणार आहे.

यंदाच्या दुसऱ्या सूर्यग्रहणाची सगळेच उत्सुकतेने वाट पाहात आहेत. पण हे ग्रहणही भारतात दिसणार नाही. ते न्यूझीलंड, फिजी, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया या भागात दिसेल.

मात्र यंदा दुसऱ्या सूर्यग्रहणाच्या अगोरदर दुसरे चंद्रग्रहण येणार आहे. हे दुसरे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी असेल. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे.

भारतासह संपूर्ण आशिया खंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, न्यूझीलंड या भागातही चंद्रग्रहण दिसणार आहे.

भारतीय वेळेनुसार हे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी चालू होईल. ते 8 सप्टेंबर रोजीच्या रात्री 12 वाजून 23 मिनिटांपर्यंत असेल. या दुसऱ्या चंद्रग्रहणाला भारतीयांना पाहता येईल.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.