
‘सारेगमप लिटिल चॅम्प’चे विजेतेपद पटकावणारी गायिका कार्तिकी गायकवाड लग्नबंधनात अडकली आहे.

पुणे स्थित व्यावसायिक रोनित पिसेसोबत कार्तिकीचं लग्न झालं.

मोजक्या नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत तिचा व रोनितचा विवाहसोहळा पार पडला. आता तिनं काही थ्रो बॅक पिक्चर्स शेअर केले आहेत.

कुटुंबियांसोबतचे हे फोटो कार्तिकीनं शेअर केले आहेत.

मेहंदी समारंभासाठी कार्तिकीनं गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.