
येत्या 11 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. 9 ऑगस्ट रोजी श्रावण महिना संपेल. दरम्यान, या महिन्यात काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

श्रावण महिना सुरु होण्याआधी घरातील काही वस्तू बाहेर टाकून द्यायला हव्यात. अन्यथा घरातील सुख-समृद्धीमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

आपल्या घरात तुटलेल्या, फुटलेल्या अनेक वस्तू असतात. श्रावण महिना चालू होण्याआधी या वस्तू घरातून बाहेर काढून फेकून द्यायला हव्यात. कारण तुटलेल्या वस्तू असतील तर घरात वाद चालू होतात. तसेच श्रावण महिन्यात केल्या जाणाऱ्या पूजेचा लाभही मिळणार नाही. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

तुमच्या घरात बंद घड्याळ असेल तर ते लगेच फेकून द्यायला हवे.चालणारे घड्याळ असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. थांबलेली घडी घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. त्यामुळे श्रावण सुरू होण्याआधी बंद पडलेले घड्याळ घरातून बाहेर काढावे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

घरात तुटलेल्या मूर्ती असतील तर त्यादेखील एखाद्या नदीत किंवा तलवाता विसर्जित व्यात. कारण वास्तूशास्त्रानुसार अशा मूर्ती घरात असतील तर सुख-समृद्धीमध्ये बाधा येते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)