मनगटावर बॉल लागताच तिलक वर्माच्या त्या खास घडीची चर्चा, किंमत वाचून थक्क व्हाल!
शनिवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या दोन संघांत सामना झाला. या सामन्यादरम्यान तिलक वर्मा याच्या हातातील घड्याळ चर्चेचा विषय ठरले. त्याच्या घड्याळाची किंमत वाचून तुम्ही चकित व्हाल.

सध्या देशात आयपीएलची धूम आहे. रोज दोन संघ एकमेकांना भिडतात. शनिवारी (2 मे) चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन तगड्या संघांमध्ये सामना रंगला. या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्स या संघाचा खेळाडू तिलक वर्मा याची चांगलीच चर्चा झाली.

तिलक वर्मा हा मुंबई इंडियन्स या संघाचा स्टार फलंदाज आहे. तो मैदानात फलंदाजी करत होता. परंतु 12 व्या षटकादरम्यान एक घटना घडली. या घटनेमुळे त्याने घातलेल्या घडीची चांगलीच चर्चा होत आहे.

चेन्नई संघाकडून 12 वे षटक जेमी ओव्हरटन हा टाकत होता. याच वेळी शेवटच्या चेंडूवर तिलक वर्मा याने स्कूप शॉट लगावण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू बॅटवर लागण्याऐवजी थेट त्याच्या मनगटावर असलेल्या घडाळ्यावर लागला. त्यामुळे त्याला काही प्रमाणात इजा झाली.

चेंडू एवढ्या वेगात आला की त्यामुळे त्याचे घड्याळ तेट तुटून खाली पडले. 23 वर्षीय तिलक वर्माच्या हातात हे WHOOP फिटनेस ट्रॅकिंग बँड होते. त्याची किंमत 28000 रुपये आहे. मनगटावर चेंडू लागल्याने तिलक वर्माने वैद्यकीय मदत मागवली होती.

त्यानंतर तो घडी घालून परत खेळू लागला. परंतु तो मैदानावर जास्त काळ टिकू शकला नाही. त्याने अवघ्या पाच धावा केल्या. तिलक वर्मा हा मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे.