T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपचा पहिला सामना खेळण्याआधीच ऑस्ट्रेलियासाठी वाईट बातमी
T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाने टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये अजून आपल्या अभियानाची सुरुवात केलेली नाही. पण त्याआधी ऑस्ट्रेलियाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. भारत आणि श्रीलंका यंदाच्या विश्वचषकाचे संयुक्त यजमान आहेत.

Australia vs Ireland : ऑस्ट्रेलियाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आयर्लंड विरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. पण या सामन्याआधी टीमला मोठा झटका बसला आहे. टीमचा स्फोटक फलंदाज टिम डेविड पहिल्या मॅचमध्ये खेळणार नाहीय. (PC-PTI)

टिम डेविडच्या हॅमस्ट्रिंग दुखापतीचा सामना करतोय. तसा तो फिट आहे पण आयर्लंड विरुद्ध पहिल्या सामन्याआधी त्याला रेस्ट देण्याचा प्लान आहे. ऑस्ट्रेलियाची टीम पहिल्या सामन्यात आपली मजबूत प्लेइंग इलेव्हन उतरवू शकणार नाही.(PC-PTI)

ऑस्ट्रेलियाला आधीच दोन मोठे झटके बसलेत. टीमचे दोन मोठे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि जॉश हेझलवूड टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेलेत. ऑस्ट्रेलियन टीमला त्यांची कमतरता जाणवणार आहे. टिम डेविड पहिला सामना खेळणार नाहीय. (PC-PTI)

टिम डेविडने टी20 इंटरनॅशनलमध्ये 58 डावात 36.2 च्या सरासरीने 1596 धावा केल्या आहेत. टिम डेविडचा स्ट्राइक रेट 170 च्या जवळ आहे. टी20 इंटरनॅशनलमध्ये त्याने एक शतकही झळकावलं आहे. (PC-PTI)

T20 वर्ल्ड कप 2026 साठी ऑस्ट्रेलियाई टीम: मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रेविस हेड, पॅट कमिंस, मार्कस स्टॉयनिस, जॉश हेजलवुड, नाथन एलिस, जेवियर बार्टलेट, मॅथ्यू वेड, कूपर कोनोली, एडम जंपा, मॅट कुन्हेमन, टिम डेविड, कॅमरुन ग्रीन, जॉश इंग्लिस आणि ग्लेन मॅक्सवेल.(PC-PTI)