
अमेरिकन अकादमी ऑफ डर्मेटोलॉजीकडून याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, दर पाच ते सात वेळा शेव्ह केल्यावर रेझर बदलणे आवश्यक आहे. तसेच वेगळे ब्लेडचा वापर करुन दाढी करत असाल तर प्रत्येक दाढीनंत ब्लेड बदलावा.

रेझर न बदल्यास बॅक्टेरिया पसरण्याची शक्यता निर्माण होते. तसेच रेझरवर कचरा किंवा धूळ आली असेल तर तो बदलणे योग्य आहे. तसेच रेझरचा प्रकारानुसार त्यात बदल करण्यात येतो. डिस्पोजेबल, कार्ट्रिज किंवा सुरक्षा रेझर असे तीन प्रकार आहे.

कार्ट्रिज रेझर पाच ते सात वेळा दाढी केल्यावर बदलावा. डिस्पोजेबल रेझर दोन-तीन वापरानंतर बदल करावा. तसेच सुरक्षित रेझर तीन ते पाच वेळा दाढी केल्यावर फेकून द्यावा. तसेच तुमची त्वचा, केसांची पोत यावरुन ब्लेड बदलण्याबाबत निर्णय घ्यावा.

दाढी करताना जळजळ होत असेल, केस नीट कापले जात नसतील किंवा रेझरवर गंज आला असेल तर त्यात बदल करणे गरजेचे असल्याचे लक्षात घ्यावा. योग्य वेळी रेझरमध्ये बदल केला नाही तर ते तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते.

आता बाजारात अनेक प्रकारचे रेझर मिळतात. दाढी करण्यापूर्वी रेझर स्वच्छ असावा, हे पाहून घेणे गरजेचे आहे. खराब किंवा जुन्या रेझरमुळे संसर्ग होण्याचा धोका आहे. रेझर स्वच्छ केल्यानंतरच त्याचा वापरा करा.