17 मिनिटांची शॉर्ट फिल्म, 14.5 कोटी व्ह्यूज; क्लायमॅक्स पाहून बसेल धक्का!

जर तुम्हाला काही थ्रिलर पहायची इच्छा असेल तर युट्यूबवर मोफत उपलब्ध असलेला हा शॉर्ट फिल्म नक्की पहा. या शॉर्ट फिल्मला आतापर्यंत 145 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या थ्रिलर ड्रामाच्या एकेका सीनमध्ये सस्पेन्स कच्चून भरला आहे.

| Updated on: Feb 10, 2026 | 9:49 AM
1 / 5
शॉर्ट फिल्म्स तर तुम्ही अनेक पाहिल्या असतील, पण 17 मिनिटांची ही एक अशी शॉर्ट फिल्म आहे, जी क्राइम, सस्पेन्स, थ्रिलर आणि मर्डर मिस्ट्रीने भरलेली आहे. या दमदार शॉर्ट फिल्मचा क्लायमॅक्स जबराट आहे. हा लघुपट पाहिल्यानंतर तुम्ही या विचारात पडाल की ही फक्त एक कथा होती की सत्य?

2 / 5
 अभिनेत्री टिस्का चोप्राच्या या शॉर्ट फिल्मचं नाव 'चटनी' असं आहे. अवघ्या 16 मिनिट 51 सेकंदांचा हा शॉर्ट फिल्म एका अशा ट्विस्टने सुरू होतो की कथेचा क्लायमॅक्स कसा असेल, याची तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही. यामध्ये एका अशा मध्यमवर्गीय पत्नीची (बनीता) कहाणी दाखवण्यात आली आहे, जिच्या पतीचं शेजारच्या महिलेशी विवाहबाह्य संबंध असतात.

3 / 5
या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन ज्योती कपूर दास यांनी केलं आहे, तर टिस्का चोप्रा याची निर्मातीसुद्धा आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या शॉर्ट फिल्मला युट्यूबवर आतापर्यंत 14.5 कोटींहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. यामध्ये टिस्कासोबतच रसिका दुग्गल, आदिल हुसैन, सुमित गुलाटी आणि आकाश भारद्वाज यांच्याही भूमिका आहेत.

4 / 5
'चटनी'ला आयएमडीबीवर 7.7 अशी उत्तम रेटिंग मिळाली आहे. या खतरनाक शॉर्ट फिल्मचा प्रत्येक सीन सस्पेन्सने परिपूर्ण आहे. कथेची सुरुवात एका पार्टीने होते, जिथे पती-पत्नी मिळून जातात आणि याच पार्टीत पती एका शेजारच्या महिलेकडे आकर्षित होतो. हे पाहून पत्नी दुसऱ्याच दिवशी त्या महिलेला घरी बोलावते.

5 / 5
घरी बोलावल्यानंतर बनीता तिला भजीसोबत चटणी खायला देते. ते त्या महिलेला खूपच स्वादिष्ट आणि रुचकर वाटतात. त्यानंतर बनीता जी कथा सांगते, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि काहीतरी दमदार पहायचं असेल, तर 'चटनी' ही शॉर्ट फिल्म आवर्जून पहा.