
मुंबई : पश्चिम बंगालच्या अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या यंदाच्या लोकसभा निवडणुकांपासून चर्चेत आहेत.

नुसरत जहाँ सध्या या त्यांच्या हनीमून ट्रीपवर आहेत. त्यांनी नुकतंच त्यांच्या हनीमूनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. वेस्टर्न ड्रेसमध्ये नुसरत बोल्ड अॅण्ड ब्युटीफूल दिसत आहेत.

नुसरत सध्या पती निखिल जैन यांच्यासोबत हनीमून एन्जॉय करत आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या हनीमून डेस्टीनेशनवरील काही फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये अनेक काळानंतर नुसरत या वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसल्या. नुसरत जहाँ यांनी वेस्टर्न गेटअपसोबतच भारतीय संस्कृती जपली. त्यांनी पांढऱ्या रंगाचा स्ट्रीप्ड क्रॉप टॉप आणि व्हाइट पँट घातला आहे. त्यासोबतच त्यांनी हातात लाल चूडाही घातला आहे.

यापूर्वीही नुसरत त्यांच्या लूकसाठी चर्चेत राहिल्या आहेत. खासदार झाल्यावर त्यांनी शपथ ग्रहणादरम्यान हिंदू परंपरेनुसार कुंकू, बांगड्या आणि साडी नेसून सभागृहात पाय ठेवला. त्यावेळी त्यांच्या या लूकची खूप चर्चा झाली होती.

नुसरत जहाँ यांनी उद्योजक निखिल जैन यांच्याशी विवाह केला. टर्कीच्या बोडरम शहरात 19 जून 2019 रोजी यांचा विवाहसोहळा पार पडला.