TMKOC : बबिताच्या आलिशान घराची झलक पाहून व्हाल थक्क; मुनमुन दत्ताचा रॉयल अंदाज चर्चेत!
मुनमुन दत्ता (बबिता) हिच्या सुंदर घराची सफर ! हे घर साधं, पण तितकेच रॉयल आणि आधुनिक सजावटीने नटलेलं आहे. आध्यात्मिक कोपरा, पांढऱ्या-ग्रे रंगाचे लिव्हिंग रूम, प्रशस्त किचन आणि हिरवीगार झाडे घराला एक खास स्पर्श देतात. आई आणि मांजरींसोबत राहणाऱ्या मुनमुनचे घर सकारात्मकता आणि शांतता यांचा उत्तम मेळ आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता यांचे असंख चाहते आहेत. या शोधमून घराघरात पोहोचलेल्या मुनमुन दत्ता यांचं घरंही खूप सुंदर आहे. त्यांच्या घराची झलक पाहिली, तर त्यांनी आपल्या घराची सजावट अगदी साधी, पण तितकीच रॉयल ठेवली आहे. आई आणि दोन लाडक्या पाळीव मांजरींसोबत राहणाऱ्या मुनमुन दत्ता यांच्या घरात प्रवेश करताच सर्वात आधी लक्ष वेधून घेतो तो सुंदर आध्यात्मिक कोपरा. येथे गणपती आणि देवीच्या मूर्ती अतिशय सुंदर पद्धतीने ठेवण्यात आल्या आहेत. या कोपऱ्यात घराची सकारात्मकता आणि शांतता जाण आलिशान आणि क्लासी अंदाज पाहून तुम्हीही थक्क व्हाल! या कोपऱ्यात सकारात्मकता आणि शांतता जाणवते. (Image Source | YouTube Munmun Dutta )

घरातील लिव्हिंग रूम म्हणजे एलिगन्सचा परफेक्ट नमुना! पांढऱ्या आणि ग्रे रंगातील म्युटेड सोफे, भिंतींवरील आकर्षक पेंटिंग्स आणि मिनिमल सजावट यामुळे संपूर्ण रूमला प्रीमियम लूक मिळतो.

डायनिंग एरियाची बातच काही और आहे! गोल्ड आणि रोझ-गोल्ड रंगांचं सुंदर कॉम्बिनेशन या जागेला एकदम रॉयल आणि लक्झरी फील देतं.

घराच्या सर्वात खास भागांपैकी एक असलेल्या किचनबद्दलही छान व्हाईब्स येतात. मुनमुन दत्ता हिचं किचन इतकं प्रशस्त आहे की एकाच वेळी 2 ते 3 जण आरामात स्वयंपाक करू शकतात. ग्रे आणि ब्लॅक रंगांची थीम, ब्लॅक ग्लास, ग्रे टोनच्या बाटल्या आणि सुंदर डिटेलिंगमुळे किचनला एकदम मॉडर्न आणि स्टायलिश लूक मिळतो. शिवाय, हिरवीगार झाडं या जागेला फ्रेश टच देतात. 🌿

मुनमुन हिच्या आईच्या बेडरूममध्ये हिरव्या रंगाचा सुंदर वापर करण्यात आला आहे. या रंगामुळे खोलीला शांत, प्रसन्न आणि फ्रेश वातावरण मिळतं.

तर मुनमुन दत्ता हिचं बेडरूम पांढऱ्या आणि म्युटेड रंगांनी सजवण्यात आलं आहे. ब्राइट वॉलपेपर, सुंदर पेंटिंग्स आणि साधी पण आकर्षक सजावट यामुळे ही रूम अतिशय क्लासी दिसते.

एकूणच, मुनमुन दत्ता हिच्या घरात लक्झरी, साधेपणा आणि सोफिस्टिकेशनचा जबरदस्त मेळ पाहायला मिळतो. प्रत्येक खोलीची सजावट तिच्या वेगळ्या स्टाइलमुळे खास ठरते. पडद्यावरची बबिता जितकी ग्लॅमरस आहे, तितकंच तिचं घरही स्टाइल आणि एलिगन्सने भरलेलं आहे!