
प्रचंड प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि तणावामुळे जशा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तशा त्वचेच्याही समस्या निर्माण होतात. यादरम्यान त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे.

अशा परिस्थितीत त्वचेला योग्य काळजी आणि पोषणाची गरज असते. जर तुम्हाला तुमची त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी, मुलायम आणि चमकदार बनवायची असेल तर काही गोष्टी फॉलो करा.

जोजोबा तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. लालसरपणा आणि खाज कमी करण्यास मदत करतात. ते एक्जिमा, पुरळ आणि कोरडी त्वचा यांसारख्या समस्यांपासून आराम देते.

यासोबतच गुलाबजलही त्वचेसाठी फायदेशीर ठरते. रात्री झोपताना जर तुम्ही गुलाबजल लावून झोपले तर त्वचा मऊ आणि मुलायमदार होण्यास मदत होईल.

हिवाळ्यात जर तुम्हाला चांगली त्वचा हवी असेल तर रात्री झोपताना खोबरेल तेल आणि गुलाब जल मिक्स करून लावा. यामुळे तुमची त्वचा मुलायम राहिल.