
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी योग्य योजना आखणं गरजेचं आहे. पण योजना व्यवस्थितरित्या आखली नाही तर आर्थिक फटका बसू शकतो. डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो आणि शेवटी गरीबीत जीवन जगावं लागेल.

आळसपणा आणि चालढकलपणा यशात अडसर निर्माण कतो. या दोन गुणांमुळे योग्य लक्ष्य गाठणं कठीण होतं. तसेच गरीबीचं आयुष्य जगावं लागते.

गैरव्यवस्थापन हे गरिबीचे महत्त्वाचे कारण ठरते. जर एखादी व्यक्ती आपले उत्पन्न व्यवस्थापित करण्यात, हुशारीने खर्च करण्यात आणि भविष्यासाठी बचत करण्यात अयशस्वी ठरली तर भविष्यात गरिबीत जगावं लागतं.

शिक्षण आणि कौशल्य व्यक्तीला यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. योग्य शिक्षण आणि कौशल्य नसेल तर संधी मिळणं कठीण होतं. यामुळे गरीबीत जीवन जगावं लागतं.

व्यसनाधीनता आणि वाईट संगती व्यक्तीला आर्थिक अडचणीत टाकते. त्यामुळे आर्थिक स्थिती कमकुवत होत जाते आणि गरीबीच्या दरीत व्यक्ती ढकलला जातो.