
या फोटोमध्ये दोघंही प्रचंड सुंदर दिसत आहेत. तसंच हे फोटो त्यांच्या चाहत्यांच्यासुद्धा पसंतीस उतरच आहेत.

आता अभिनेत्री प्रिया बापटनं पती उमेश कामतसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

प्रिया आणि उमेश या दोघांची रिल आणि रिअल लाईफ जोडी सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असते.

प्रियाची ही पोस्ट 'तुझ्यामुळे मी हे 2020 वर्ष पार केलं...' अशा आशयाची आहे.

एक मस्त फोटो शेअर करत ' मिस्टर कामत, 2020 हे वर्ष मी फक्त तुमझ्यामुळे पार करू शकले. जेव्हा मी माझ्या सर्व ताणतणावाशी निपटण्यात व्यस्त होते तेव्हा तू प्रत्येक ठिकाणी माझी मदत केली. स्वयंपाक करणं, लॉकडाऊनमध्ये भांडी धुणं, आपल्या आई-वडिलांची काळजी घेण्यापासून माझे सर्व काम करणं....' असं लांब कॅप्शन देत प्रियानं ही पोस्ट शेअर केली आहे.