
हिवाळा जवळपास सर्वांनाच आवडतो. विशेष म्हणजे हिवाळ्यात मार्केटमध्ये ताज्या ताज्या भाज्या आणि फळे येतात. शिवाय थंडीमध्ये सकाळी व्यायाम करण्याची मजाच काही वेगळी आहे.

पण असे असले तरीही हिवाळ्यात आरोग्याच्या समस्या अधिक निर्माण होतात आणि आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. हिवाळ्यात जास्त आजारी पडण्याचे प्रमाण असते.

हिवाळ्यात जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर सर्वात महत्वाचे ठरते की, तुम्ही काय खाता. थोडे जरी आरोग्याकडे दुर्लक्ष झाले तर असंख्य समस्या निर्माण होतात.

संतुलित आहारासोबतच, आले, तुळस आणि काळी मिरी यांसारख्या औषधी वनस्पतीचा हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी समावेश करा, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होतील.

या गोष्टीचा जर तुम्ही दररोजच्या आहारात समावेश केला तर तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होईल. शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही झपाट्याने वाढण्यास मदत होईल.