Gold Price Today : लग्नसराईच्या मोसमातच सोन्याचा भडका, भाव ऐकून बसेल चटका.. आज 10 ग्रॅम सोन्यासाठी खिसा किती होणार खाली ?

Todays Gold Rate 07 May 2026 Updates in Marathi : सोने आणि चांदीच्या भावात कधी वाढ तर कधी घसरण असं चित्र काही दिवस दिसत होतं. मात्र आज मात्र सोन्याच्या आणि चांदीच्या दरांनी वर झेप घेतली असून सर्वसामान्य ग्राहकांना ते विकत घेताना 10 वेळा विचार करावा लागणार आहे. 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर किती ?

| Updated on: May 07, 2026 | 2:44 PM
1 / 5
मे महीना म्हणजे सुट्ट्यांचा महीना. याच महिन्यात हमखास लग्नाचे मुहूर्तही बरेच असतात. लग्नसराईच्या सीझनमध्ये अनेक जण सोन्याचांदीचे दागिने घेण्यासाठी ज्वेलरकडे धाव घेतात, पण सध्या सोन्याच्या आणि चांदीचया भावांनीही एवढी मोठी झेप घेतली आहे की थोडंथोडकंही सोनं, चांदी घेतानाही घाम फुटतो.  त्यातच आता आजचे सोन्याचे दर आणि चांदीचे रेटही समोर आले आहेत.

मे महीना म्हणजे सुट्ट्यांचा महीना. याच महिन्यात हमखास लग्नाचे मुहूर्तही बरेच असतात. लग्नसराईच्या सीझनमध्ये अनेक जण सोन्याचांदीचे दागिने घेण्यासाठी ज्वेलरकडे धाव घेतात, पण सध्या सोन्याच्या आणि चांदीचया भावांनीही एवढी मोठी झेप घेतली आहे की थोडंथोडकंही सोनं, चांदी घेतानाही घाम फुटतो. त्यातच आता आजचे सोन्याचे दर आणि चांदीचे रेटही समोर आले आहेत.

2 / 5

गुरूवारी, पुन्हा एकदा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. कालही सोन्याच वाढ झाली होती, तीच वाढ आजही कायम दिसत्ये. त्यामुळे खरेदीदारांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. आज सोनं खरेदी करायचा विचार असेल तर आधी हे भाव जाणून घ्या, मगच पुढे पाऊल टाका.

3 / 5

7 मे रोजी सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे, म्हणजे 10 ग्रॅम सोन्याच्या दरात तब्बल 330 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर चांदीचे दरही गगनाला भिडण्याच्या तयारीत असून प्रति किलो चांदीमागे तब्बल 5000 रुपये वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. लग्नाची धामधूम, तयारी सुरू असताना दुसरीकडे या धातूंचे भाव वाढल्याने सर्वसामान्य लोकांच्या खिशाला मात्र चांगलाच फटका बसू शकतो.

4 / 5

गुरुवारी सराफ बाजार उघडल्यावर 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 330 रुपयांनी वाढून 1 लाख 52 हजार, 460 रुपये झाले. तर 22 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे, 1तोळ्याचे दर 300 रुपयांनी वाढले असून किंत आता 1 लाख 39 हजार, 750 रुपये झालीये. 18 कॅरेटचं सोनंही महागलं असून त्याचे दर 200 रुपयांनी वाढून 1 लाख 14 हजार 340 रुपये इतके आहेत.

5 / 5

सोन्याप्रमाणेच चांदीदी चकाकाही वाढली असून 1 किलोमागे चांदी जवळपास 5 हजार रुपयांनी महागली आहे. चांदीचे दर आज 2 लाख 70 हजारांच्या आसपास पोहोचले आहेत. ( ही माहिती उपलब्ध स्त्रोतांवरून घेण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी , आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर -त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us