Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: आज अचानक सोने आणि चांदीच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदी करताना विचार करावा लागणार आहे. आजचा 10 ग्रॅम सोन्याचा आणि एक किलो चांदीचा भाव किती? जाणून घ्या...

| Updated on: Jul 22, 2026 | 4:57 PM
1 / 5
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा अनेक गोष्टींवर परिणाम होताना दिसत आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल, एलपीजी अशा अनेक गोष्टींच्या किंमती आकाशाला स्पर्श करत आहेत. तसेच सोने आणि चांदीचा भाव देखील वाढत असल्याचे चित्र आहे.

2 / 5

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

3 / 5

22 जुलै रोजी सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक तोळा सोन्याची किंमत जीएसटीसह 1 लाख 49 हजार 350 रुपयांवर पोहोचली आहे.

4 / 5

तर दुसरीकडे चांदीच्या दरात तब्बल 5 हजारांची वाढ झाली आहे. त्यामुळे जीएसटीसह चांदीचे दर 2 लाख 36 हजार 900 रुपयांवर पोहोचले आहेत.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us