
यंदाच्या वर्षीचे शेवटचे चंद्रग्रहण देशाच्या अनेक भागांमध्ये दिसले. हे ग्रहण रात्री 9.58 वाजता सुरू झाले आणि रात्री 1.26 ला संपले. फक्त भारतच नाही तर इतरही काही देशांमध्ये हे चंद्रग्रहण दिसले आहे.

ग्रहण संपल्यानंतर त्याचा सुतक काळही संपला. विशेष म्हणजे या ग्रहणाबद्दल लोकांच्या मनात चांगलीच उत्सुकता ही बघायला मिळावी. लोक रात्री घराबाहेर पडून हे ग्रहण बघत होते.

हे पूर्ण चंद्रग्रहण होते. चंद्र हा पूर्णपणे भगव्या रंगाचा होताना दिसला, ग्रहणादरम्यान काही मोठे बदल होताना चंद्रात दिसले. प्रत्येकासाठी हा नक्कीच एक वेगळा आणि खास अनुभव राहिला.

देशभरातील लोकांनी रात्री 11:1 ते 12:23 पर्यंत हे दृश्य पाहिले. ब्लड मून अंदाजे 82 मिनिटे दिसला. विशेष म्हणजे अनेकांनी आपल्या मोबाईलमध्येही हे क्षण कैद केले.

पूर्ण चंद्रग्रहणाला ब्लड मून म्हणतात आणि या काळात पृथ्वीच पृष्ठभागाची सावली ही चंद्रावर पडते. अनेक लोक चंद्रग्रहणाच्या वेळी अनेक कामे करणे टाळतात.