
मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये अखेरकार पर्यटकांना पहिल्यांदाच चित्त्याचं दर्शन झालं आहे. उत्साहित पर्यटकांनी हा क्षण लगेचच त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून घेतला. हे फोटो आता बरेच व्हायरल झाले आहेत.

कूनोमध्ये चित्त्याने दर्शन दिल्याने येत्या काळात या पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार हे निश्चित ! पर्यटकांनी पाहिलेल्या चित्त्याचे नाव पवन असून तो उघड्या जंगलात सोडलेल्या दोन चित्त्यांपैकी एक आहे.

गेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सीनियर मॅनेजर कूनो पार्कमध्ये फिरायला गेले होते. जिप्सीमधून त्यांनी अहेरा बीटमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना अचानक समोर एका चित्त्याचे दर्शन घडले. जिप्सी चालकाने दिलल्या माहितीनुसार, त्या चित्त्याचे नाव पवन आहे.

हे दृश्य पाहून उत्साहित झालेल्या पर्यटकांनी भराभर त्या चित्त्याचे फोटो आणि व्हिडीओही काढले.

कुनो नॅशनल पार्कच्या खुल्या जंगलात सध्या फक्त पवन हा एक नर चित्ता आणि वीराही एक मादी चित्ता वीरा उपस्थित आहे.

येत्या काळात पर्यटकांना या चित्त्यांचे वारंवार दर्शन होणार यात शंका नाही.