‘टॉक्सिक’मधील ‘तबाही’ गाण्यातील इंटिमेट सीन्सवरून प्रचंड टीका; कियाराबद्दल नेटकरी म्हणाले..

'केजीएफ' स्टार यश आणि कियारा अडवाणी यांचा 'टॉक्सिक' हा चित्रपट सतत विविध कारणांमुळे चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

| Updated on: Jul 09, 2026 | 8:28 AM
1 / 5
'केजीएफ' फेम यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटातील पहिलं गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'तबाही' असं या गाण्याचं नाव असून 4 मिनिट 28 सेकंदांच्या या गाण्यात कियारा अडवाणी आणि यश यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पहायला मिळतेय.

2 / 5
याआधी 'टॉक्सिक'चा टीझर त्यातील इंटिमेट आणि बोल्ड सीन्समुळे चर्चेत आला होता. त्यानंतर आता या गाण्यातही यश आणि कियारा यांच्या इंटिमेट सीन्सचा भरणा पहायला मिळतोय. यावरून सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. या गाण्यात यश रफ अँड टफ लूकमध्ये असून त्याचा दमदार स्क्रीन प्रेझेन्स काहींना खूप आवडतोय. तर कियाराचा अत्यंत ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज आहे.

3 / 5
एकीकडे यश आणि कियाराची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असून दुसरीकडे काही युजर्स गाण्यावरून प्रश्नही उपस्थित करत आहेत. संपूर्ण गाण्यात कियाराला फक्त सुंदर दाखवण्यात आणि रोमँटिक फ्रेम्सपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आल्याचं काहींनी म्हटलंय. फक्त गाणंच नाही तर ट्रेलरमध्येही कियाराला फक्त ग्लॅमरस चेहरा म्हणून दाखवण्यात आल्याची टीका केली आहे.

4 / 5
काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'टॉक्सिक'च्या टीझरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता. हा टीझर म्हणजे अडल्ट प्रॉडक्ट्सच्या जाहिरातींप्रमाणे वाटत असल्याची खिल्ली काहींनी उडवली होती. चित्रपटात कियाराच्या भूमिकेला काही वाव देण्यात आला की नाही, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

5 / 5
गीतू मोहनदास दिग्दर्शित 'टॉक्सिक' हा चित्रपट येत्या 26 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी आणि यश यांच्याशिवाय नयनतारा, तारा सुतारिया, हुमा कुरेशी आणि रुक्मिणी वसंत यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Follow Us