आजीच्या हाताची चव असणारं चुलीवरचं झणझणीत वांग्याचं भरीत ; एकदा खाल तर बोट चाटत राहाल

चुलीवर भाजलेल्या वांग्याचा धुरकट सुगंध आणि लसूण-मिरचीचा ठसका भरीताची चव खुलवतो. ज्वारीच्या किंवा बाजरीच्या गरमागरम भाकरीसोबत हा पारंपरिक पदार्थ नक्की करून पाहा.

| Updated on: Oct 12, 2026 | 9:54 PM
1 / 5
चुलीवरचं वांग भाजताना घरभर पसरणारा तो  करपलेला सुगंध, ठेचलेला लसूण- मिरचीचा वास. झणझणीत कच्च्या कांद्याचा वास त्याची कुरकुरीच चव आहाह....चुलीवरच्या वांग्याच्या भरीताची सरच निराळी. चला पाहूयात गावाकडच्या पद्धतीत चुलीवरचं वांग्याचं भरीत कसं करायचं

चुलीवरचं वांग भाजताना घरभर पसरणारा तो करपलेला सुगंध, ठेचलेला लसूण- मिरचीचा वास. झणझणीत कच्च्या कांद्याचा वास त्याची कुरकुरीच चव आहाह....चुलीवरच्या वांग्याच्या भरीताची सरच निराळी. चला पाहूयात गावाकडच्या पद्धतीत चुलीवरचं वांग्याचं भरीत कसं करायचं

2 / 5

चविष्ट भरीत बनवायचं असेल तर मोठं,ताजं आणि गर असलेलं वागं निवडा.वांग्याच्या सालीवर मोठे डाग किंवा कुजलेले भाग नसावेत. वांग चुलीवर भाजल्यावर त्याचा गर मऊ होतो आणि त्याला छान धुरकट चव येते

3 / 5

चुलीवरील निखाऱ्यांवर किंवा मध्यम आचेवर वांग ठेवून सर्व बांजूनी भाजा. भाजताना वांगं अधूनमधून फिरवत राहा. साल काळवंडून आतला गर मऊ झाल्यावर ते बाजूला काढा. गर पूर्ण शिजला आहे याची खात्री करा. त्यानंतर गर हाताने किंवा चमच्याचे व्यवस्थित कुस्करून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घाला.

4 / 5

गरम तेलाची फोडणी : कढईत तेल टाकून व्यवस्थित गरम करा, त्यात लसूण- मिरचीचा ठेचा घाला. त्यानंतर त्यात कुस्करलेलं वांग,मीठ आणि कांदा, मसाले मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करा. सर्व मिश्रण मंद आचेवर परतून घ्या.

5 / 5

चुलीवर भाजलेल्या वांग्याचा सुगंध आणि लसूण मिरचीचा ठसका यामुळे पदार्थाची चव खुलते.तयार भरीत ज्वारीच्या किंवा बाजरीच्या गरमागरम भाकरीसोबत वाढा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us