Trisha-Vijay : त्यावेळी त्रिशा कृष्णने सरळ साखरपुडा मोडला, म्हणाली मी प्रेग्नेंट होईन तेव्हाच..भावी मुख्यमंत्र्यांसोबत तिच्या लग्नाची चर्चा
Trisha Krishnan-TVK Vijay : सध्या देशात आणि सोशल मीडियावर त्रिशा कृष्णन आणि थलपती विजय या दोघांची भरपूर चर्चा आहे. फिल्म इंडस्ट्री आणि तामिळनाडूचं राजकारण यांचं जुन नातं आहे. एमजी रामचंद्रन, जयललिता यांच्यापासून ही पंरपरा सुरु आहे. आता पुन्हा एकदा तामिळ राजकारणात भूतकाळाची पुनरावृत्ती होणार असं दिसू लागलय.

सोमवारी देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात तामिळनाडू विधानसभेचा निकाल खूप वैशिष्ट्यपूर्ण ठरला. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही प्रस्थापित पक्षांना नाकारुन तामिळ जनतेने टीव्हीके या नव्या पक्षाला सत्तेची संधी दिली. हा टीव्हीके पक्ष अभिनेता थलपती विजयने स्थापन केलेला आहे.

TVK या राजकीय पक्षाचं वय अवघं 2 वर्षाचं आहे. इतक्या कमी कालावधीत या पक्षाच्या हाती राज्याची सत्ता सोपवणं हे कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नाही. म्हणून टीव्हीकेचा संस्थापक विजय आणि त्याच्या व्यक्तिगत आयुष्य चर्चेचा विषय बनलं आहे. विजयने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात खटला दाखल केला आहे.

थलपती विजय यांचं नाव त्रिशा कृष्णन सोबत जोडलं जातं. लवकरच दोघे लग्न करणार असल्याची चर्चा आहे. त्रिशा आणि विजय हे सहकलाकार आहेत. दोघांनी अनेक चित्रपटात काम केलं आहे. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध बहरल्याचं बोललं जातं. पण दोघांनी अजून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही.

आता त्रिशा कृष्णनची मोडलेल्या साखरपुड्याबाबतची एक स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 2015 साली त्रिशाने चेन्नई स्थित बिझनेसमन वरुण मानियन सोबत साखरपुड्याची घोषणा केली होती. पण तिला अभिनय सोडायला सांगितला, म्हणून तिने काही महिन्यात साखरपुडा मोडून टाकला. टाइम्स ऑफ इंडियाने तिच्या जुन्या मुलाखतीचा हवाला देत हे वृत्त दिलं आहे.

मी ज्याच्यासोबत लग्न करणार होते, त्याने मला अभिनय सोडायला सांगितला. म्हणून मी साखरपुडाचा रद्द केला. मी ज्यावेळी प्रेग्नेंट होईन त्याचवेळी ब्रेक घेईन. मला मुख्य भूमिका मिळाली नाही तरी चालेल. मी माझ्या प्रतिमेला सूट होतील अशा भूमिका करेन. पण मी चित्रपट सृष्टीपासून लांब जाणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत अभिनय करण्याची माझी इच्छा आहे असं त्रिशाने त्या मुलाखतीत सांगितलं होतं.