
साऊथ सुपरस्टार कमल हासन यांच्या 'ठग लाइफ' या चित्रपटातील काही सीन्सवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 70 वर्षीय कमल हासन हे 41 वर्षीय अभिनेत्री अभिरामीला किस करताना दिसले. तर 42 वर्षीय अभिनेत्री तृषा कृष्णनसोबत ते रोमँटिक होताना दिसले.

'ठग लाइफ'चा ट्रेलर प्रदर्शित होताच या दोन्ही सीन्सवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तृषा आणि अभिरामी यांनी त्यांच्यापेक्षा वयाने जवळपास 30 वर्षांनी मोठ्या असलेल्या कमल हासन यांच्यासोबत इंटिमेट सीन्स करणं युजर्सना पटलं नाही.

सोशल मीडियावर प्रेक्षक आपली नाराजी व्यक्त करत आहेत. 'तृषा ही कमल हासन यांची मुलगी श्रुती हासनपेक्षा फक्त तीन वर्षांनी मोठी आहे', असं एकाने लिहिलं. तर 'अभिरामी ही तृषापेक्षा फक्त दोन महिन्यांनी मोठी आहे', असं दुसऱ्याने म्हटलंय.

मुलीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत कमल हासन यांचे इंटिमेट सीन्स पाहून काही प्रेक्षक भडकले आहेत. या वादादरम्यान तृषा कृष्णनची जुनी मुलाखतसुद्धा चर्चेत आली आहे. कमल हासन यांच्यासोबतचा चित्रपट साइन करण्यापूर्वी हा संपूर्ण प्रवास जादुई असेल याची जाणीव झाल्याचं तृषाने म्हटलं होतं.