
पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील पळसदेव हद्दीत बुधवारी रात्री दोन वाजता मालवाहतूक ट्रकला भीषण आग लागली. या आगीत मालवाहतूक ट्रक जळून खाक झाला. यावेळी महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली.

ट्रकचे लायनर गरम झाले होते. चालकाला ही गोष्टी लक्षात आली नाही. त्यानंतर ट्रकला आग लागल्याचे कळताच चालक आणि किन्नरने गाडीतून बाहेर उडी घेतली. त्यामुळे चालक आणि किन्नर बचावले अन्यथा अनर्थ घडला असता. सुदैवाने दोघेही सुरक्षित आहेत.

आग लागल्याची माहिती त्वरित अग्नीशमन दलाला कळवण्यात आली. त्यानंतर अग्नीशमन दिल्याच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री २ ते ५ वाजेपर्यंत ही आग सुरु होती. महामार्गावर लांबून आगीचे लोट दिसत होते. काही तास आगीचे हे तांडव सुरु होते.

ट्रकमध्ये टिशू पेपरची वाहतूक होती. त्यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले. या आगीत ट्रक जळून खाक झाला. आगीच्या या घटनेमुळे पहाटे महामार्गावर काही काळ लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. परंतु अनेक वाहन धारकांनी दुसऱ्या मार्गाने प्रवास केला.

ट्रकला लागलेल्या आगीमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली. त्यानंतर सकाळी पाच वाजेनंतर वाहतूक सुरुळीत झाली.