अशा मिळवा घनदाट आयब्रोज, फॉलो करा 5 शानदार टिप्स

चांगल्या, घनदाट आयब्रोज हव्या असतील तर घरच्या घरी काही उपाय करता येऊ शकतात.

| Updated on: Feb 23, 2023 | 1:39 PM
1 / 6
 आयब्रोजमुळे डोळ्यांचे सौंदर्य वाढते. लांब, घनदाट भुवयांसाठी महिला अनेक उपाय करतात. काही महिलांच्या भुवया पातळ आणि लहान असतात. त्याची वाढ वाढवण्यासाठी, बहुतेक स्त्रिया महाग सौंदर्य उत्पादने वापरतात. असे असूनही महिलांच्या भुवया आकर्षक होत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

2 / 6
ऑलिव्ह ऑईल - भुवयांची चांगली वाढ व्हावी यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइलची मदत घेऊ शकता. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी भुवयांवर ऑलिव्ह ऑईल लावा. आता भुवयांना हलक्या हातांनी  5 ते 10 मिनिटे मसाज करा. यामुळे तुम्हाला 15 दिवसांत फरक दिसेल.

3 / 6
कोरफडीचा रस - भुवया सुंदर करण्यासाठी कोरफडीच्या रसाचा वापर उत्तम ठरतो. अशावेळी हाताच्या बोटांवर थोडा कोरफडीचा रस घेऊन भुवयांना मसाज करा. ही कृती दिवसातून दोनदा केल्याने भुवया काळ्या आणि जाड दिसू लागतील

4 / 6
 कच्चे दूध - काळ्या आणि चमकदार भुवया मिळविण्यासाठी तुम्ही कच्चे दूध वापरू शकता. अशावेळी कापसाच्या साहाय्याने भुवयांवर कच्चे दूध लावा. दिवसातून एकदा लावल्याने तुमच्या डोळ्यांच्या भुवया काळ्या आणि चमकदार होतील.

5 / 6
खोबरेल तेल - नारळाच्या तेलाचा वापर भुवयांसाठी सर्वोत्तम सौंदर्य उपचार देखील सिद्ध होऊ शकतो. त्यासाठी हातावर खोबरेल तेल घेऊन भुवयांना लावा. ही कृती दिवसातून दोनदा केल्यास तुमच्या भुवया जाड आणि काळ्या होतील.

6 / 6
कांद्याचा रस -  भुवयांच्या वाढीचा वेग वाढवण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस वापरू शकता. कांद्याचा रस काढून तो रोज भुवयांवर लावा. यामुळे तुम्हाला जाड व काळ्या भुवया मिळतील.