
स्मार्टफोन जसजसे जुने होतात तसतशा त्यात अनेक त्रुटी दिसून येतात. कालांतराने बॅटरी बॅकअप कमी होतो, नंतर त्याचा परफॉर्मन्सही कमी होऊ लागतो. तर, कधीकधी स्मार्टफोनमधील आवाजाचा गोंधळ देखील त्रासदायक ठरतो.

काही लोकांना त्यांच्या फोनचा आवाज अचानक कमी होण्याची समस्या येते, तर काहींना त्यांच्या फोनवर अजिबात आवाज येत नाही. अशा परिस्थितीत, तो दुरुस्त करणे हा पर्याय उरतो. मात्र, काही अशी ट्रिक्स किंवा युक्ति आहेत ज्या अशा परिस्थितीत उपयुक्त ठरू शकतात आणि फोनचा कमी झालेला आवाज पुन्हा व्यवस्थित येऊ लागेल.

आवाज कसा वाढवायचा?: स्मार्टफोनचा आवाज वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत. पण सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्ले स्टोअरमधून साउंड बूस्टर किंवा व्हॉल्यूम बूस्टर अॅप इन्स्टॉल करणे आणि त्यात काही सेटिंग्ज करणे. असे केल्याने, स्मार्टफोनची ध्वनी गुणवत्ता पूर्वीपेक्षा चांगली झाल्याचं तुम्हाला जाणवेल.

जर हे करूनही तुम्हाला तुमच्या फोनचा आवाज नीट ऐकू येत नसेल, तर त्याशिवायही अनेक युक्त्या आहेत ज्या वापरून तुम्ही तुमच्या फोनच्या स्पीकरचा आवाज वाढवू शकता.

स्पीकरची स्वच्छता: जर फोनचा स्पीकर नीट काम करत नसेल तर स्पीकरमध्ये घाण साचलेली असण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत टूथब्रशच्या किंवा बड्सच्या मदतीने स्पीकर स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. असे केल्याने आवाज मोठ्या प्रमाणात वाढेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ते टूथब्रशवर हलका स्प्रे देखील करू शकता. मात्र फोनचा स्पीकर साफ करताना काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.

फोन रीस्टार्ट करा: स्मार्टफोनमधील कोणताही दोष दुरुस्त करण्यापूर्वी, प्रत्येक युजर हा स्वतःच्या पातळीवर तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी प्रथम फोन रीस्टार्ट करावा. अशा परिस्थितीत, व्हॉल्यूम सुधारण्यासाठी तुम्हालाही असेच करावे लागेल.

कव्हर काढा: स्मार्टफोनच्या संरक्षणासाठी अनेकदा जड कव्हर वापरले जाते. परंतु कव्हरमध्ये घाण साचल्यामुळे स्पीकरवरही परिणाम होतो आणि आवाज मंदावतो. बऱ्याचदा, तुमच्या फोनचे कव्हर तुमच्या मोबाईलच्या स्पीकरला झाकत असते. त्यामुळे स्पीकरमधून येणारा आवाज कमी येतो.

ही समस्या सहसा अनेक कारणांमुळे उद्भवते. उदाहरणार्थ, जर फोनच्या स्पीकरमध्ये हार्डवेअर दोष असेल तर तुम्ही अॅप्सच्या मदतीनेही ते दुरुस्त करू शकणार नाही. याशिवाय, घाण साचल्यामुळे देखील हे घडते. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)