किचनमध्ये पाल, झुरळ दिसल्यास खैर नाही, तुकाराम मुंढेंचा थेट इशारा, सांगितलं किचन कसं असावं?

नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले आहेत. विशेष म्हणजे आस्थापनांमधील किचन नेमके कसे असावे, याविषयीदेखील तुकाराम मुंढे यांनी सविस्तर सांगितले आहे.

| Updated on: Jun 24, 2026 | 9:01 PM
1 / 5
अन्न आणि औषध प्रशासनाने विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांनी आज (24 जून) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी खाद्य पदार्थ विकणाऱ्या आस्थापनांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.

2 / 5
नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले आहेत.  विशेष म्हणजे आस्थापनांमधील किचन नेमके कसे असावे, याविषयीदेखील तुकाराम मुंढे यांनी सविस्तर सांगितले आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले आहेत. विशेष म्हणजे आस्थापनांमधील किचन नेमके कसे असावे, याविषयीदेखील तुकाराम मुंढे यांनी सविस्तर सांगितले आहे.

3 / 5
मुंढे यांनी सांगितल्यानुसार किचनमधील भिंती आणि फरशींना टाईल्स असाव्या. या टाईल्स वाशेबल असायला हव्यात. किचनमध्ये चिमनी आणि एक्झॉस्ट असणे महत्त्वाचे आहे. कच्चामाल ठेवण्यासाठी वेगळी मांडणी असणं अनिवार्य आहे.

4 / 5
शाहाकारी तसेच मांसाहारी पदार्थ वेगळे ठेवणं बंधनकारक आहे. कच्चे आणि शिजवलेले अन्न अनिवार्य आहे. ग्राहकांसाठी हँड टॉवेल असायला हव्यात. किचनमध्ये पेस्ट कंट्रोल केलेले असायला हवे. इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅपही असणे गरजेचे आहे. किचनमध्ये झुरळ, पाली नसायला पाहिजेत.

5 / 5
गरम जेवण म्हणजेच त्याचे तापमान 60 डिग्री असले पाहिजे. थंड जेवण म्हणजे त्याचे तापमान 4 डिग्री  असले पाहिजे. तसेच फ्रोझन म्हणजे -18 डिग्री असलं पाहिजे, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us