
'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री गायत्री दातार तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत चाहत्यांना साखरपुड्याची माहिती दिली.

माझ्या आयुष्यात हिरोची एण्ट्री झाली आहे.. अशी पोस्ट लिहित गायत्रीने काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिच्या हातात साखरपुड्याची अंगठीसुद्धा पहायला मिळाली होती. त्याचसोबत गायत्रीच्या आयुष्यातील हा हिरो नेमका आहे तरी कोण, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झाले.

आता गायत्रीने त्याच्यासोबतचा आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. समुद्रकिनारी दोघांनी रोमँटिक पोझ दिली आहे. परंतु यातसुद्धा गायत्रीचा हिरो नेमका कोण आहे, हे समजत नाही. पण लवकरच त्याच्याबद्दलची माहिती देणार असल्याचं गायत्रीने सांगितलं आहे.

'तुम्ही सर्वांनी आमच्यावर दाखवलेल्या प्रेमाने आणि पाठिंब्याने आम्ही भारावून गेलो आहोत. लव्ह यू इन्स्टा फॅमिली आणि हो मला माहितीये की तुम्हाला खूप उत्सुकता आहे माझा पार्टनर कोण आहे हे जाणून घेण्याची. मी लवकरच सगळी माहिती नक्की शेअर करेन', असं तिने लिहिलं आहे.

'काही कथा दाखवण्यासाठी नव्हे तर अनुभवण्यासाठी असतात.. अजून तरी..' असंही तिने या पोस्टमध्ये म्हटलंय. गायत्रीच्या या फोटोवरही चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.