
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकविन चांगलाच धडा’ या मालिकेत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अक्षराच्या आयुष्यात अनपेक्षित वळण येतंय.

घर सोडून अक्षरा आता तिच्या आई-वडिलांकडे राहतेय.. ती आणि अधिपती एकमेकांना खूप मिस करतात, पण त्यांचा स्वाभिमान त्यांना जवळ येऊ देत नाही.

आयुष्यात पुढे जाण्याचा निर्धार करून अक्षरा सूर्यवंशी शाळेत पुन्हा जाणं सुरू करते. मात्र, पहिल्याच दिवशी भुवनेश्वरी तिच्यासमोर उभी राहते आणि सांगते की अक्षराने सूर्यवंशी घर सोडलं असल्याने तिला त्या शाळेत काम करण्याचा हक्क नाही.

या आरोपांवर अक्षरा खंबीरपणे उत्तर देते की, ती फक्त अधिपतीच्या सांगण्यावरूनच राजीनामा देईल. दरम्यान, गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होत असतानाच, अक्षराला एक जीवन बदलणारी गोष्ट समजते.

अक्षराला ती प्रेग्नंट असल्याचं कळतं. या धक्कादायक बातमीमुळे तिच्या आणि अधिपतीच्या ताणलेल्या नात्यावर काय परिणाम होईल? हे अंतर कमी होईल की नव्या संघर्षाला सुरुवात होईल, हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.