
हिवाळा म्हटले की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. सर्दी, खोकला आणि ताप हे तर सामान्य होते. अशावेळी आरोग्यासाठी सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक होते.

हिवाळ्यात सर्वात मोठी समस्या ही गळ्यातील त्रास असतो. गळ्यात त्रास होतो आणि खरखर होते. यामुळे बऱ्याचदा खाणेही कठीण होऊन बसते. यावर उपाय म्हणून आपण गरम पाणी पितो.

गरम पाणी सतत पिण्यापेक्षा काढा ही समस्या दूर करू शकतो. खास काढ्याचा आहारात समावेश करा. ज्यामुळे गळ्याती खरखरीची समस्या दूर होण्यास मदत होईल.

या करिता पाच तुळशीची पाने, दोन काळी मिरी आणि एक छोटा आल्याचा तुकडा पाण्यात उकळवा. नंतर ते गाळून घ्या आणि कोमट होऊ द्या. त्यानंतर हे पाणी प्या.

दररोज जरी आपण हे घेतले तरीही ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे निरोगी राहण्यास मदत होईल. काढ्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.