Donkey Marriage : दोन गाढवांचं थाटात लग्न, नवरी सजली अन् बार उडाला, अख्ख्या गावात तुफान जल्लोष; त्या लग्नाची चर्चा!

दोन गाढवांचे लग्न लावून देण्यात आले. विशेष म्हणजे वधू आणि वर असलेल्या गाढवांचे नावही ठेवण्यात आले होते. वर असलेल्या गाढवाचे नाव कांतेश तर वधू असलेल्या गाढवाचे नाव कस्तुरी असे ठेवण्यात आले.

| Updated on: Jul 05, 2026 | 6:38 PM
1 / 5
भारतात वेगवेगळ्या भागात चक्क आणि थकित करणाऱ्या परंपरा आहेत. काही परंपरा तर एवढ्या विचित्र आणि चमत्कारिक असतात की त्या ऐकताच आपण थक्क होऊन जातो. सध्या अशाच एका आगळ्यावेगळ्या परंपरेची चर्चा होत आहे.

भारतात वेगवेगळ्या भागात चक्क आणि थकित करणाऱ्या परंपरा आहेत. काही परंपरा तर एवढ्या विचित्र आणि चमत्कारिक असतात की त्या ऐकताच आपण थक्क होऊन जातो. सध्या अशाच एका आगळ्यावेगळ्या परंपरेची चर्चा होत आहे.

2 / 5

कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातल मुन्याल गावात चक्क दोन गाढवांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. गावात पाऊस यावा म्हणून हा विवाह लावून देण्यात आल्याचे बोलले जात आहे. पाऊस पडत नसेल तर अशा प्रकारे गाढवांचे लग्न लावून देण्याची जुनी परंपरा त्या भागात आहे.

3 / 5

याच परंपरेचा एक भाग म्हणून दोन गाढवांचे लग्न तिथे लावून देण्यात आले. विशेष म्हणजे वधू आणि वर असलेल्या गाढवांचे नावही ठेवण्यात आले होते. वर असलेल्या गाढवाचे नाव कांतेश तर वधू असलेल्या गाढवाचे नाव कस्तुरी असे ठेवण्यात आले.

4 / 5

कस्तुरी आणि कांतेश यांना छान सजवून मंदिरात परंपरेनुसार विवाह लावून देण्यात आला. या विवाहासाठी समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांना वधूपक्ष आणि वरपक्षात विभागले गेले होते. दोन्ही बाजूच्या पाहुण्यांनी या नवरी-नवरदेवाला आशीर्वाद दिले आहेत.

5 / 5

दरम्यान, गावात पाऊस यावा, म्हणून गाढवांचे लग्न लावून देण्याची परंपरा असल्यानेच हा विवाह लावून देण्यात आला. असे लग्न लावल्यास चांगला पाऊस होतो, असे तेथील लोकांची धराणा आहे. या विवाहाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us