2 तास 16 मिनिटांचा सस्पेन्स चित्रपट; ‘दृश्यम 3’सारखाच तगडा क्लायमॅक्स

सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ पहायला मिळते. असाच एक चित्रपट सस्पेन्स आणि जबरदस्त क्लायमॅक्सच्या बाबतीत 'दृश्यम 3'लाही टक्कर देतो. ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.

| Updated on: Jun 24, 2026 | 9:40 AM
1 / 5
सस्पेन्स-थ्रिलर हा बहुतांश प्रेक्षकांचा सर्वांत आवडता जॉनर असतो. ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे प्रेक्षकांना आता कोणत्याही वेळी त्यांच्या आवडत्या शैलीतील चित्रपट किंवा वेब सीरिज पाहता येतात. दर आठवड्याला किंवा महिन्याला किंवा वर्षाला एखादा असा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येतो, ज्याची कथा विशेष छाप सोडून जाते. पाच वर्षांपूर्वी असाच एक चित्रपट प्रदर्शित झाला होता.

2 / 5
पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला नेटफ्लिक्सवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाचा क्लायमॅक्सच इतका दमदार आहे की आजही प्रेक्षक तो कितीही वेळा पाहिला तरी त्यांचं समाधान होत नाही. 'दृश्यम 3' आणि 'महाराजा' यांपेक्षाही अधिक दमदार या चित्रपटाचा क्लायमॅक्स आहे.

3 / 5
या चित्रपटाच्या कथेची सुरुवात राणी या भूमिकेपासून होते, जिच्यावर तिच्या पतीच्या हत्येचा आरोप असतो. एका स्फोटात राणीचा पती जळून मरतो, पण पोलिसांना त्याचा मृतदेहच सापडत नाही. त्यांना फक्त एक हात सापडतो. राणी ही दिल्लीतली अत्यंत स्वच्छंदी मुलगी असते, जिचं लग्न एका लहान शहरातील इंजीनिअरशी होतं. मात्र त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेकदा तणाव निर्माण होतो.

4 / 5
राणीच्या पतीचा चुलतभाऊ नील हा त्यांच्या घरी वारंवार येत असतो. त्यांच्यात जवळीक निर्माण होते आणि ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. राणीच्या डायरीमुळे पोलिसांना संशय निर्माण होतो आणि त्यामुळे राणीच्या पतीच्या हत्येमध्ये नीलसुद्धा सामील असल्याचा समज निर्माण होतो. मात्र जसजशी ही कथा पुढे सरकते, तसतसे थक्क करणारे पैलू आणि सत्य समोर येतं.

5 / 5
या चित्रपटाचा क्लायमॅक्ससुद्धा एकदा प्रभावी आहे की तुम्हाला एक मिनिटही जागेवरून उठण्याची इच्छा होणार नाही. या चित्रपटाचं नाव 'हसीन दिलरुबा' असून यामध्ये तापसी पन्नूने राणीची भूमिका साकारली आहे. तापसीसोबत विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणे यांच्या यात मुख्य भूमिका आहेत.

Follow Us